KKR vs SRH Final Toss: महामुकाबल्यात हैदराबादच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, पहिले बॅटिंग की फिल्डिंग?
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Final IPL 2024 Toss: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत आमनेसामने आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामना खेळण्यसाठी सज्ज झाले आहेत. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबाद मैदानात उतरणार आहे. तर श्रेयस अय्यर याच्या कॅप्टन्सीत कोलकाता नाईट रायडर्स हैदराबाद विरुद्ध दोन हात करणार आहे. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील चेपॉक अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस उडवण्यात आला. हैदराबादने टॉस जिंकला. कॅप्टन पॅट कमिन्स याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने या हंगामात क्वालिफायर 1 सामन्यात हैदराबादचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर सनरायजर्स हैदराबादने दुसऱ्या संधीत राजस्थान रॉयल्सला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली.
आकडेवारीत कोलकाता सरस
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांमध्ये आयपीएलमध्ये एकूण 27 सामने झाले आहेत. केकेआरचा या 27 पैकी सर्वाधिक सामन्यात बोलबाला राहिला. कोलकाताने हैदराबादचा 18 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने कोलकातावर 9 सामन्यात विजय मिळवला. तसेच दोन्ही संघ या हंगामात साखळी फेरीत आणि त्यानंतर क्वालिफायर 1 मध्ये भिडले होते.कोलकाताने या दोन्ही सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला होता.
दोन्ही संघांची अंतिम सामन्याबाबत महत्त्वाची माहिती
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांची अंतिम सामन्यात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर हैदराबादची ही अंतिम सामना खेळण्याची 2018 नंतरची पहिली आणि एकूण तिसरी वेळ आहे. हैदराबादने याआधी 2016 आणि 2018 साली अंतिम सामना खेळला होता. तर दुसऱ्या बाजूला कोलकाताची ही फायनलमध्ये खेळण्याची चौथी वेळ आहे. कोलकाता 2012, 2014, 2021 नंतर आता चौथ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. तसेच चेन्नईत 12 वर्षानंतर पहिल्यांदा अंतिम सामना होत आहे. याआधी 2012 साली केकेआर विरुद्ध चेन्नई यांच्यात महामुकाबला झाला होता. तेव्हा चेन्नईचा धुव्वा उडवत केकेआर पहिल्यांदा चॅम्पियन झाली होती.
हैदराबादने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨
Sunrisers Hyderabad 🧡 elect to bat in the #Final against Kolkata Knight Riders 💜
Follow the Match ▶️ https://t.co/lCK6AJCdH9#TATAIPL | #KKRvSRH | #TheFinalCall pic.twitter.com/f4PWxfLFEK
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन: (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट खेळाडू: अनुकूल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.
सनरायजर्स हैदराबाद इम्पॅक्ट खेळाडू: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मारकंडे, अब्दुल समद आणि वॉशिंगटन सुंदर.
