RR vs PBKS सामन्याला काही तास बाकी असताना टीमचा हुकमी एक्का IPL मधून बाहेर

IPL 2024 : आयपीएल स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात गेली असताना टीमला मोठा झटका बसला आहे. यंदाच्या मोसमात या खेळाडूने छाप पाडली नसली तरी तो आता बाहेर झाला आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

RR vs PBKS सामन्याला काही तास बाकी असताना टीमचा हुकमी एक्का IPL मधून बाहेर
sanju samson and sam curran rr vs pbks
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 15, 2024 | 4:54 PM

आयपीएल 2024 स्पर्धा आता शेवटाकडे आली असून काही सामने बाकी आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ क्वालिफाय झाले आहेत. दोन स्थानांसाठी मोठी चुरस रंगताना दिसणार आहे. आयपीएलनंतर वर्ल्ड कप सुरू होणार असून काही संघातील खेळाडू परदेशी जात आहेत. मात्र काही खेळाडूंच्या मागे दुखापती लागल्या आहेत. या दुखापतीमुळे एक मोठा परदेशी खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडलाय. आता राहिलेल्या सीझनमध्ये तो खेळताना दिसणार नाही. आजचा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. मात्र त्याआधी टीमला मोठा झटका बसला आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आहे. दुखापती असल्याने त्याने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली आहे. आता वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये कागिसो रबाडा आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज आहे.

पंजाब किंग्ज प्लेऑफ बाहेर पडला असून दोन सामने बाकी आहेत. 2015 पासून पंजाब किंग्सला प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं करता आलं नाही. त्यामुळे परिस्थितीत कागिसो रबाडाच्या न खेळण्याचा त्याच्या संघावर फारसा परिणाम होणार नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये रबाडाला आपली छाप पाडता आली नाही. कारण ११ सामन्यांमध्ये त्याला 8.86 सरासरीने त्याला अवघ्या 11 विकेट घेता आल्या.

 

T20 विश्वचषक 2024 साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नोर्खिया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिबेझ स्टुब्सी, ट्रिबेझ स्टुब्सी.