KKR vs PBKS : प्रभसिमरन सिंहचं वादळी अर्धशतक, केकेआरला चोख प्रत्युत्तर, पण एक चूक नडली

| Updated on: Apr 26, 2024 | 10:45 PM

Prabhsimran Singh KKR vs PBKS IPL 2024 : पंजाब किंग्सचा इमपॅक्ट प्लेअर प्रभसिमरन सिंहने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झंझावाती अर्धशतक ठोकलं. प्रभसिमरनने खऱ्या अर्थाने इमपॅक्टफुल खेळी केली.

KKR vs PBKS :  प्रभसिमरन सिंहचं वादळी अर्धशतक, केकेआरला चोख प्रत्युत्तर, पण एक चूक नडली
Prabhsimran Singh,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी दिलेल्या 262 धावांच्या विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या सलामी जोडीने वादळी सुरुवात केली आहे. प्रभसिमरन सिंह आणि जॉनी बेयरस्टो या दोघांनी मैदानात आल्या आल्या बॅट फिरवायला सुरुवात केली. या जोडीने पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये धुमाकुळ घातला. प्रभसिमरन सिंहने तर कोलकाताच्या गोलंदाजांना फोडून काढला. प्रभसिमरनने केकेआर विरुद्ध अर्धशतक ठोकलं. मात्र त्यानंतर त्याची एक चूक ही घोडचूक ठरली.

प्रभसिमरनने अवघ्या 18 बॉलमध्ये वादळी अर्धशतक ठोकलं. प्रभसिमरन पंजाबसाठी तिसरं वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला. पंजाबसाठी सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम केएल राहुल याच्या नावावर आहे. केएलने 14 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. प्रभसिमरनने कोलकाता विरुद्ध पहिल्याच बॉलपासून टॉप गिअरमध्ये बॅटिंग करायला सुरुवात केली आणि अर्धशतक ठोकलं पण त्याने एक चूक केली आणि केकेआरला पहिला झटका लागला.

नक्की काय झालं?

प्रभसिमरन आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीने जोरदार फटकेबाजी केली. जॉनीने पावरप्लेच्या अखेरच्या म्हणजेच सहाव्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केली. जॉनीने अनुकूलच्या या ओव्हरमधील पहिल्या पाच बॉलमध्ये 24 धावा मिळवल्या. जॉनीने अनुक्रमे 4,6,4,4,6 अशी फटकेबाजी केली. मात्र पावरप्लेच्या शेवटच्या बॉलवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात प्रभसिमरन सिंह स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. प्रभसिमनरची 1 धाव घेण्याची चूक चांगलीच महागात पडली आणि तो आऊट झाला. यासह पंजाबची सलामी जोडी 93 धावांवर फुटली.

नरेनचा कडक थ्रो आणि प्रभसिमरनच्या खेळीचा द एन्ड

प्रभसिमरनने अवघ्या 20 बॉलमध्ये 270 च्या स्ट्राईक रेटने 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. प्रभसिमरन 54 धावांवर आऊट झाला, मात्र त्याने पंजाबला 262 धावांच्या आव्हानानुसार धमाकेदार सुरुवात करुन दिली.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रायली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.