
श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात, गौतम गंभीर, चंद्रकांत पंडित आणि अभिषेक नायर या अनुभवी त्रिकुटाच्या मार्गदर्शनात कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवत आयपीएलच्या 17 व्या मोसमातील किंग टीम ठरली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने महाअंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरला विजयासाठी 114 धावांचं आव्हान मिळालं होतं. केकेआरने हे आव्हान 10.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. वेंकटेश अय्यर याने केकेआरसाठी नाबाद 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रहमानुल्लाह गुरुबाज याने 39 धावांचं योगदान दिलं. सुनील नरीन आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी 6 धावा केल्या. केकेआरच्या या विजयानंतर खेळाडूंचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. केकेआरच्या विजयाने धीर ‘गंभीर’ चेहऱ्याच्या गौतमलाही हसू आवरता आलं नाही.
केकेआरच्या विजयानंतर खेळाडूंनी मैदानात धावत एकच जल्लोष केला. खेळाडूंनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. गौतम गंभीर याच्या चेहऱ्यावरही केकेआरच्या विजयाचा आनंद दिसला. त्यानंतर केकेआरचा मालक आणि किंग खान अर्थात शाहरुख खान याने प्रत्येक खेळाडूंचं अभिनंदन करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. शाहरुखने या दरम्यान गौतम गंभीरचं खास अभिनंदन केलं. शाहरुखने या वेळेस गंभीरच्या कपाळ्यावर पप्पी दिली. गंभीरची पप्पी घेतानाचा शाहरुखचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा विजयी जल्लोष
📽️ 𝗥𝗔𝗪 𝗥𝗘𝗔𝗖𝗧𝗜𝗢𝗡𝗦
Moments of pure joy, happiness, jubilation, and happy tears 🥹
What it feels to win the #TATAIPL Final 💜
Scorecard ▶️ https://t.co/lCK6AJCdH9#KKRvSRH | #Final | #TheFinalCall | @KKRiders pic.twitter.com/987TCaksZz
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन: श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.