IPL 2024 LSG vs RR Live Streaming : लखनऊसमोर राजस्थानचं आव्हान, पराभवाचा वचपा घेणार का?

| Updated on: Apr 26, 2024 | 6:59 PM

Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Live Streaming : लखनऊ आणि राजस्थान या दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना महत्त्वाचा आहे.

IPL 2024 LSG vs RR Live Streaming : लखनऊसमोर राजस्थानचं आव्हान, पराभवाचा वचपा घेणार का?
sanju samson and k l rahul ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमात शनिवारी 27 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमेनसामने असणार आहेत. या दोन्ही संघांची 17 व्या मोसमात आममनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 24 मार्च रोजी राजस्थानने लखनऊवर 20 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता लखनऊकडे हा सामना जिंकण्यासह राजस्थानकडून पराभवाचा वचपा घेण्याची दुहेरी संधी आहे. आता यात लखनऊ यशस्वी ठरणार की राजस्थान विजय मिळवून प्लेऑफसाठी क्वालिफाय करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणर आहे.

राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा हा या 17 व्या मोसमातील नववा सामना आहे. राजस्थानने 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. राजस्थान 14 पॉइंट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर लखनऊने 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊ 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे.

लखनऊ विरुद्ध राजस्थान सामना केव्हा?

लखनऊ विरुद्ध राजस्थान सामना 27 एप्रिलला होणार आहे.

लखनऊ विरुद्ध राजस्थान सामना कुठे?

लखनऊ विरुद्ध राजस्थान सामना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम, येथे होणार आहे.

लखनऊ विरुद्ध राजस्थान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनऊ विरुद्ध राजस्थान सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

लखनऊ विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

लखनऊ विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

लखनऊ विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

लखनऊ विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेराक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौथम,ॲश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नंदरे , युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.