IPL 2024 : पंड्या कुटुंबात छोट्या पाहुण्याचं आगमन, क्रिकेटरला पुत्ररत्न, नाव काय?

Krunal Pandya Son Name : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. पंड्या कुटुंबामध्ये छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. क्रिकेटरने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

IPL 2024 : पंड्या कुटुंबात छोट्या पाहुण्याचं आगमन, क्रिकेटरला पुत्ररत्न, नाव काय?
krunal pandya and hardik pandya,
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Apr 26, 2024 | 6:19 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत 41 सामने पार पडले आहेत. आता सर्व संघामध्ये प्लेऑफसाठी चढाओढ पाहायला मिळत आहेत. या 17 व्या हंगामात आज 26 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 42 वा सामना होणार आहे. या सामन्याआधी क्रिकेटर बंधु पंड्या कुटुंबातून मोठी बातमी समोर आली आहे. पंड्या कुटुंबात छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या काका झाला आहे. हार्दिकचा भाऊ आणि लखनउ सुपर जायंट्सकडून खेळणारा अष्टपैलू कृणाल पंड्या दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. कृणालने सोशल मीडियावरुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे.

णालने सोशल मीडियावर एकूण 3 फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कृणाल त्याची पत्नी आणि मुलगा पंखुरी-कविर आहेत. तर पंखुरीच्या हातात दुसरा मुलगा आहे. कृणाल आणि पंखुरी या दोघांनी आपल्या दुसऱ्या बाळाचं नाव वायू असं ठेवलं आहे. तसेच कृणालने वायूची जन्म तारीखेचाही उल्लेख या पोस्टमध्ये केलाय. वायूचा जन्म 21 एप्रिल रोजी झालाय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कृणाल आणि पंखुरीचं अभिनंदन केलंय. तसेच कृणालची ही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे.

कृणाल आणि पंखुडी

कृणाल आणि पंखुडी हे दोघे 2017 साली विवाह बंधनात अडकले होते. लग्नाच्या 5 वर्षांनंतर या दोघांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. कृणालच्या मोठ्या मुलाचं नावं कवीर असं आहे. त्यानंतर आता 2 वर्षांनी कृणाल पुन्हा एकदा बाबा झालाय. कृणालने वायूच्या जन्माच्या 5 दिवसांनंतर ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीय.

हार्दिक पंड्या दुसऱ्यांदा झाला काका

कृणालची कामगिरी

दरम्यान कृणालने आतापर्यंत आयपीएलच्या 17 व्या मोसमात लखनऊकडून एकूण 8 सामने खेळले आहेत. कृणालने या 8 सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कृणालने 5 डावात 58 धावाही केल्या आहेत. कृणालंच या हंगामातील आतापर्यंतची 43 ही सर्वोच्च धावसंख्या आहेत. तसेच कृणालने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 121 सामन्यांमध्ये 1 अर्धशतकासह 1 हजार 572 धावा केल्या आहेत. तर 75 विकेट्सही घेतल्या आहेत.