SRH vs CSK : हैदराबाद टॉसचा बॉस, चेन्नईत 3 बदल, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?

Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Toss : चेन्नई सुपर किंग्स सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणार आहे. हैदराबादने टॉस जिंकून काय निर्णय घेतला?

SRH vs CSK : हैदराबाद टॉसचा बॉस, चेन्नईत 3 बदल, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
srh vs csk toss ipl 2024
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 05, 2024 | 7:35 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 18 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादचं नेतृत्व आहे. तर ऋतुराज गायकवाड चेन्नईचं कर्णधारपद सांभाळत आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादने टॉस जिंकला. पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

दोन्ही संघात बदल

चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. चेन्नईने 3 आणि हैदराबादने 1 बदल केला आहे. हैदराबादच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये मयंक अग्रवाल याच्या जागी नीतीश रेड्डी याला संधी देण्यात आली आहे. तर टी नटराजन याचं कमबॅक झालंय. तसेच चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथीशा पथीराणा आजारी असल्याने तो या सामन्याला मुकला आहे. सीएसकेने या सामन्यासाठी मोईन अली, महेश तीक्षणा आणि मुकेश चौधरी या तिघांना संधी देण्यात आली आहे.

चेन्नईच सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने झाले आहेत. त्यापैकी 14 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली आहे. तर फक्त 5 सामन्यात हैदराबादला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे हैदराबाद आता चेन्नई विरुद्ध सहावा विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

हैदराबाद विरुद्ध चेन्नई आमनेसामने

चेन्नई सुपर किंग्ज प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.

सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.