Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG : लखनऊसमोर पलटण अपयशी, पाहा हेड टु हेड रेकॉर्ड्स

IPL 2024 MI vs LSG Head To Head Records : मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आपला अखेरचा सामना हा वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे.

MI vs LSG : लखनऊसमोर पलटण अपयशी, पाहा हेड टु हेड रेकॉर्ड्स
Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 5:59 PM

आयपीएलचा 17 वा हंगाम मुंबई इंडिनय्ससाठी निराशाजनक राहिला. हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीत मुंबईला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरीक करता आली नाही. मुंबईने गेल्या हंगामात मु्ख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीतही प्लेऑफपर्यंत धडक मारली होती. मात्र यंदा मुंबईचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. इतकंच काय, मुंबई स्पर्धेतून बाहेर पडणारी पहिलीच टीम ठरली. मुंबई आता या हंगामातील आपला अखेरचा सामना खेळणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान असणार आहे.

मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यातील सामना हा 17 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्य होणार आहे. लखनऊचा देखील हा या मोसमातील अखेरचा सामना असणार आहे.त्यामुळे दोन्ही संघांचा विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघांची ही या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. लखनऊने 30 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे पलटणसमोर मागील पराभवाचा वचपा घेण्याचं आव्हानही असणार आहे.

मुंबईची कामगिरी आणि हेड टु हेड रेकॉर्ड्स

मुंबईने या हंगामात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी मुंबईला फक्त 4 सामने जिंकण्यात यश आलंय. तर 7 वेळा मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी दहाव्या स्थानी आहे. मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यात आतापर्यंत एकूण 5 सामना झाले आहेत. त्यापैकी लखनऊने 4 सामने जिंकले आहेत. तर मुंबईला केवळ 1 सामनाच जिंकण्यात यश आलंय.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेराक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक होउ, कृष्णा हो गौथम, ॲश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.