AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, MI vs PBKS : नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सने जिंकला, गोलंदाजी घेत सॅम करन म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेतील 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघासाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. विजय मिळवून गुणतालिकेत झेप घेण्याची संधी आहे. नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. सॅम करनने गोलंदाजी घेतली आणि म्हणाला..

IPL 2024, MI vs PBKS : नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सने जिंकला, गोलंदाजी घेत सॅम करन म्हणाला...
| Updated on: Apr 18, 2024 | 7:21 PM
Share

आयपीएल स्पर्धेत प्लेऑफची शर्यत पाहता मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना महत्त्वाचा आहे. अजूनही सर्वच संघांच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. मात्र प्लेऑफचा प्रवास सोप करण्यासाठी धडपड सुरु आहे. पंजाब किंग्स आठव्या, तर मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर आहे. या सामन्यातील विजयी संघ गुणतालिकेत वर झेप घेऊ शकतो. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकण्याची संधी आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार सॅम करनने गोलंदाजी स्वीकारली आणि प्लेइंग इलेव्हनबाबत सांगितलं. पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन म्हणाली की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. स्पर्धेचा ट्रेंड चालू ठेवू. शिखरची तब्येत बरी नाही, त्यामुळे आजही नाही. दुसरीकडे रिली आज जॉनीसाठी मैदानात उतरणार आहे. जवळचे खेळ गमावणे चांगले नाही परंतु आम्ही बऱ्याच गोष्टी बरोबर करत आहोत. तायडे संघात नाही आणि दोन बदल आहेत.”

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, “आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती, त्यामुळे नाणेफेक गमावणे चांगले असं मानू. आम्ही कामगिरीची समिक्षा करू शकत नाही. दोन वेळा आमच्या हातात खेळ होता आणि विजय मिळाल नाही. आयपीएल तुमची परीक्षा घेते, जेव्हा खेळ संपत नाही तोपर्यंत संपत नाही. आम्ही प्रत्येक सामन्यातून चांगलं घेत पुढे जात आहोत.आम्ही आमचे 100 टक्के देऊ. प्रत्येक व्यक्तीने संघाच्या ध्येयासाठी वचनबद्ध असले पाहिजे आणि एकदा आपण ते केले की त्याचे परिणाम दिसून येतील. तीच टीम असणार आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.