
मुंबई इंडिन्सचा स्टार ओपनर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने सोमवारी 1 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध निराशा केली. रोहित शर्मा ट्रेंट बोल्टच्या बॉलिंगवर झिरोवर आऊट झाला. रोहित मुंबईच्या डावातील पहिल्याच बॉलवर कॅच आऊट झाला. राजस्थानचा विकेटकीपर कॅप्टन संजू सॅमसन याने रोहितचा कॅच घेतला. रोहितने बॉल मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटचा कट घेऊन संजूच्या दिशेने गेला आणि रोहित आऊट झाला. यासह रोहितच्या आयपीएल कारकीर्दीला डाग लागला आहे.
रोहितने शून्यवर आऊट होत नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहितची आयपीएल इतिहासात शून्यावर बाद होण्याची ही 17 वी वेळ ठरली. तर या आधी हा विक्रम आरसीबीच्या दिनेश कार्तिक याच्या नावावर होता. आता रोहित आणि दिनेश कार्तिक संयुक्तरित्या 17 वेळा झिरोवर बाद होणारे फलंदाज ठरले आहेत.
सुनील नरेन – 15
मनदीप सिंह – 15
पीयूष चावला – 15
ग्लेन मॅक्सवेल – 15
दिनेश कार्तिक – 17
रोहित शर्मा – 17
दरम्यान ट्रेंट बोल्टने मुंबई इंडियन्सला जोरदार झटका दिला. रोहित शर्मा याच्यानंतर ट्रेंटने दुसऱ्याच बॉलवर नमन धीर यालाही पहिल्याच बॉलवर झिरोवर आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर डावातील तिसऱ्या आणि आपल्या कोट्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये ट्रेंटने पुन्हा झटका दिला. ट्रेंटने डेवाल्ड ब्रेव्हिस यालाही झिरोवर बाद केलं. त्यामुळे मुंबईचे पहिले 3 फलंदाज भोपळा न फोडताच माघारी गेले.
मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह आणि क्वेना मफाका.
राजस्थान रॉयल्स प्लेईंग ईलेव्हन : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहल.