AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 | 2022ला अनसोल्ड, नीता अंबानींनी घेतल्यावर 2023मध्ये टॉप विकेटटेकर, पलटणसाठी ठरला ‘ओल्ड इज गोल्ड’

पीयुष चावलाने वय फक्त आकडा आहे हे दाखवलंच, पण एक हंगामात अनसोल्ड राहिला त्यानंतर संधी मिळाल्यावर टीमकडून सर्वाधिक विकेट घेत कमबॅक काय असतं हा दाखवून दिलं.

IPL 2024 | 2022ला अनसोल्ड, नीता अंबानींनी घेतल्यावर 2023मध्ये टॉप विकेटटेकर, पलटणसाठी ठरला 'ओल्ड इज गोल्ड'
| Updated on: Mar 19, 2024 | 8:10 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या थराराला सुरूवात होत आहे. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये एक असा खेळाडू आहे की जो भारताने दोन्ही वर्ल्ड कप जिंकले त्या संघाचा सदस्य होता. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पीयुष चावला आहे. आयपीएलमध्ये पलटण संघात तरूण खेळाडूंचा भरणा दिसतो, मात्र चावलाला संघात स्थान घेतल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. याच पियुष चावलाने मागील सीझनमध्ये 16 सामने खेळत 22 विकेट घेतल्या होत्या.

चावला म्हणजे ओल्ड इज गोल्ड

2008 पासून आयपीएल खेळत आलेला पियुष चावला हा टी-20 वर्ल्ड कप 2007 आणि  वन डे वर्ल्ड कप 2011 च्या विनर टीमचा सदस्य आहे. चावला सुरूवातीची सहा वर्षे म्हणजेच 2008 पासून 2014 पर्यंत पंजाब संघाकडून खेळला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि आता मुंबई इंडियन्सकडून तो खेळत आहे.

तरूण भारतीय खेळाडू

पियुष चावला कसोटीमध्ये पदार्पण करणारा दुसरा सर्वात तरूण भारतीय खेळाडू आहे. 2006 मध्ये नागपूर इंग्लंडविरुद्धच्या कसोटीमध्ये त्याने डेब्यू केला होता. सचिन तेंडुलकरनंतर तो दुसरा सर्वात तरूण डेब्यू करणारा खेळाडू ठरला होता. टीम इंडियाकडून फारशी त्याला संधी मिळाली नाही. मात्र आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने खेळत कायम आपली लढण्याची वृत्ती जगाला दाखवून दिली. मागील वर्षी मुंबईकडून खेळताना त्याने 16 सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या होत्या. मुंबई इंडियन्सकडून 2023 च्या हंगामात त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. पर्पल कॅपच्या यादीमध्ये तो चौख्या क्रमांकावर होता. त्यामुळे यंदाही मुंबईला त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत. टीममधील अनुभवी खेळाडू असल्याने मॅनेजनेंट त्याच्यावर विश्वास दाखवतं.

पीयुष चावला नाही खचला…

पीयुष चावला याला 2022 मध्ये कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. त्यानंतर त्याला मुंबईने परत एकदा 50 लाख रूपयांना खरेदी केलं. आधी मुंबईनेच 2021 मध्ये 2 कोटी 40 लाख रूपयांना घेतलं होतं, मात्र त्याला मध्ये रीलीजही केलं. जेव्हा 2022 चा लिलाव पार पडला त्याला कोणत्याच फ्रँचायसीने बोली लावली नाही तो अनसोल्ड राहिला होता. मुंबईने त्याला 50 लाख लावत परत एकदा खरेदी केलं. त्यानेही टीमसाठी 100 टक्के देत सर्वाधिक विकेट घेतल्या.

पीयुष चावलाची आयपीएलमधील कामगिरी

पीयुष चावला याला आयपीएलमध्ये तगडा अनुभव आहे, त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या संघांकडून 181सामने खेळले असून 179 विकेट्स घेतल्या आहेत. 4-17 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. आयपीएलमधील सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये पीयुष चावला तिसऱ्या क्रमांकार आहे. यंदा त्याच्याकडे पहिल्या नंबरला जाण्याची मोठी संधी आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएल फायनल संंघ 2024:-  हार्दिक पांड्या (C), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमा, रोहित ब्रेव्हिस, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.