IPL 2024, PBKS vs CSK : पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा संघ ठरला ‘किंग्स’, कमी धावसंख्या असूनही गाठलं खिंडीत

आयपीएल 2024 स्पर्धेतील 53वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सवर धावांनी विजय मिळवला आहे. खरं तर पंजाबपुढे 168 धावांचं आव्हान होतं. मात्र हे आव्हान गाठताना नांगी टाकली.

IPL 2024, PBKS vs CSK : पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा संघ ठरला किंग्स, कमी धावसंख्या असूनही गाठलं खिंडीत
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 05, 2024 | 7:07 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 53व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्सला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळालं होतं. चेन्नईने दिलेल्या धावा सहज गाठू असा सॅम करनचा अंदाज होता. मात्र त्याचं हे भाकीत खोटं ठरलं. गोलंदाजांनी पंजाब किंग्सला चांगल्या प्रकारे मदत केली. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 9 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना पंजाबच्या फलंदाजांनी नांगी टाकली.  चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 9 गडी गमवून 139 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सने पंजाबला 28 धावांनी विजय मिळवला. जॉनी बेअर स्टो दुसऱ्या षटकात विकेट देऊन बसला. त्याने फक्त 7 धावा केल्या तंबूत परतला. त्यानंतर त्याच षटकात रिली रोस्सो खातं न खोलता बाद झाला. त्यामुळे दडपण वाढलं. प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंग यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 53 धावांची भागीदारी केली. मात्र एक चुकीचा फटका मारला आणि शशांक सिंग विकेट देऊन बसला. त्यानंतर विकेट्सची रांग लागली. जितेश शर्माही आपलं खातं खोलू शकला नाही. तो तंबूत परतत नाही तर सॅम करन 7 धावा करून बाद झाला. त्याच षटकात आशुतोष शर्मा 3 धावांवर झेल देऊन बसला. यामुळे विजयाचं पारडं चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने झुकलं होतं.

रवींद्र जडेजाने 4 षटकात 20 धावा देत 3 गडी बाद केले. तुषार देशपांडेने 4 षटकात 35 धावा देत 2 गडी बादे केले. त्याचा हा स्पेल पंजाब किंग्ससाठी महागात पडला. कारण मोक्याच्या क्षणी त्याच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसले. या विजयासह चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाला दणका दिला आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे. आता चेन्नई सुपर किंग्सने उर्वरित तीन सामन्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे.