IPL 2024 PBKS vs MI Live Streaming : पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात कडवी झुंज, विजयी ट्रॅकवर कोण परतणार?

| Updated on: Apr 17, 2024 | 3:42 PM

Punjab Kings vs Mumbai Indians Live Streaming : पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघांची स्थिती सारखी आहे. दोघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

IPL 2024 PBKS vs MI Live Streaming : पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात कडवी झुंज, विजयी ट्रॅकवर कोण परतणार?
pbks vs mi ipl 2024,
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सांभाळणार आहेत. तर पंजाब किंग्सच्या टीमची धुरा शिखर धवन याच्याकडे आहे. पंजाब आणि मुंबई या दोन्ही संघांची सध्या सारखीच स्थिती आहे. त्यामुळे हा सामना जिंकून प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी या मोसमात खेळलेल्या 6 पैकी 4 सामने गमावले आहेत. तर 2 सामने जिंकले आहेत. पंजाब आणि मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत.

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना केव्हा?

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना 18 एप्रिल रोजी होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना महाराजा यादविंद सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर येथे होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना किती वाजता सुरु होणार?

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच tv9 मराठी वेबसाईटवर सामन्याबाबत रियल टाईम अपडेट्स मिळतील.

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळेल?

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येईल.

पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर) , सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.