AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, PBKS vs SRH : पंजाबने जिंकला नाणेफेकीचा कौल, गोलंदाजी निवडत कर्णधार शिखर धवन म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ आमनेसामने येत आहेत. या दोन्ही संघांचा हा पाचवा सामना असून गुणतालिकेत प्रत्येकी चार गुण आहेत. त्यामुळे या सामन्यातील विजय खूपच महत्त्वाचा आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने लागला आणि गोलंदाजी निवडली.

IPL 2024, PBKS vs SRH : पंजाबने जिंकला नाणेफेकीचा कौल, गोलंदाजी निवडत कर्णधार शिखर धवन म्हणाला...
IPL 2024, PBKS vs SRH : टॉस जिंकत पंजाबने निवडली गोलंदाजी, दोन्ही संघाची अशी असेल प्लेइंग इलेव्हन
| Updated on: Apr 09, 2024 | 7:10 PM
Share

आयपीएल 2023 स्पर्धेत वरचढ ठरण्यासाठी पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ धडपड करत आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार पैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत वरचं स्थान मिळवण्याचा प्रयत्न असेल. पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 21 वेळा सामना झाला. यात 14 वेळा सनरायझर्स हैदराबादने, तर 7 वेळा पंजाब किंग्सने बाजी मारली आहे. मोहालीची खेळपट्टी भारतातील सर्वात वेगवान असल्याचं सांगितलं जातं.ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना त्याच्या उसळीत मदत करते. पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट तशीच राहील, त्यामुळे त्यांना कमी धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न असेल. शेवटचा सामना जिंकण्यासाठी आम्ही भाग्यवान ठरलो. हे चांगले आहे की आम्ही कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नाही. आम्ही दोन गेम जिंकले आहेत, चांगल्या धावांची अपेक्षा आहे. लियाम लिव्हिंगस्टोन अजूनही बरा होत आहे. आम्ही त्याच संघात खेळत आहोत.”

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, “आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. आम्ही ज्या मार्गाने जात आहोत त्याबद्दल एकूणच आनंदी आहोत. दोन विजय आणि आम्ही आणखी एक गेम आमच्या मार्गावर जाऊ शकलो असतो. आमच्याकडे चांगली ताकद आहे. शेवटी खेळला तो संघ असणार आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले.
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया.
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.