AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा विजय, मालिकाही जिंकली, इंग्लंडचं 11 दिवसांत काम तमाम

Australia vs England 3rd Test Match Result : ऑस्ट्रेलियाने एडलेडमध्ये इंग्लंडवर मात करत सलग तिसरा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने यासह पुन्हा एकदा ही मालिका आपल्या नावावर केली. एलेक्स कॅरी 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा विजय, मालिकाही जिंकली, इंग्लंडचं 11 दिवसांत काम तमाम
Australia Cricket TeamImage Credit source: PTI
| Updated on: Dec 21, 2025 | 2:10 PM
Share

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने मायदेशात इंग्लंड विरूद्ध प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजमध्ये (Ashes Series 2025-2026) विजयी घोडदौड कायम राखली आहे. ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथ याच्या नेतृत्वात 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांत दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 21 डिसेंबरला पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात तिसर्‍या सामन्यात इंग्लंडचा 82 धावांनी धुव्वा उडवत विजयी हॅटट्रिक केली. ऑस्ट्रेलियाने यासह मालिका नावावर केली. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने एकतर्फी आघाडी घेतलीय. तसेच ऑस्ट्रेलिया ही ट्रॉफी आपल्याकडे कायम राखण्यात यशस्वी ठरलीय.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 435 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडनेही जोरदार झुंज दिली. मात्र इंग्लंडला 352 धावांपर्यंतच पोहचता आलं. इंग्लंडने अशाप्रकारे सामन्यासह मालिका गमावली. विकेटकीपर एलेक्स कॅरी हा तिसऱ्या विजयाचा हिरो ठरला. कॅरीने या सामन्यात एकूण 178 धावा केल्या. तसेच 6 कॅचही घेतल्या.

इंग्लंडचं 11 दिवसांत काम तमाम

ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकत पाहुण्या इंग्लंडचा 11 दिवसांत हिशोब केला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 11 दिवसांत आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना हा पाचव्या दिवशी जिंकला.

ऑस्ट्रेलियाने त्याआधी पर्थमध्ये झालेल्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा दुसऱ्याच दिवशी धुव्वा उडवला होता. ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात इंग्लंडला 8 विकेट्सने पराभवाची धुळ चारली होती. तर ब्रिस्बेनमधील दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी चौथ्या दिवशी इंग्लंडवर मात केली होती. ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेनमधील सामनाही 8 विकेट्सने आपल्या नावावर केला होता. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे इंग्लंडचा 11 दिवसांत हिशोब करत मालिका जिंकली.

ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम

दरम्यान ऑस्ट्रेलियाने या विजयासह या प्रतिष्ठेच्या मालिकेत आपला दबदबा कायम राखला आहे. ऑस्ट्रेलियाची ही मालिका जिंकण्याची सलग 5 वी वेळ ठरली. ऑस्ट्रेलियाने 2017-18 साली एशेज सीरिज जिंकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2019 साली ही मालिका आपल्या नावावर कायम राखली. ऑस्ट्रेलियाने त्यानंतर 2021-22, 2023 आणि त्यानंतर आता 2025-26 ही मालिका जिंकण्याची मालिका कायम ठेवली आहे.

एलेक्स आणि हेडची शतकी कामगिरी

एलेक्सने पहिल्या डावात शतक झळकावलं. एलेक्सने 143 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्ससह 106 धावांची खेळी केली. एलेक्सच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 300 पार मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने ऑलआऊट 371 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने मालिका राखली

इंग्लंडला प्रत्युत्तरात 286 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने यासह 85 धावांची आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाने त्यानंतर दुसऱ्या डावात 349 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी दुसर्‍या डावात ट्रेव्हीस हेड याने सर्वाधिक 170 धावा केल्या. तर कॅरीने 128 चेंडूत 6 षटकारांसह 72 धावांचं योगदान दिलं. मात्र इंग्लंडला 435 धावांचा पाठलाग करताना ऑलआऊट 349 रन्सच करता आल्या.

महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले.
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया.
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.