AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mission IPL 2024 : अखेर RCB नेही भाकरी फिरवली, टीम मॅनेजमेंटने घेतला मोठा निर्णय

आयपीएलमधील एकही सीझनमध्ये आतापर्यंत आरसीबी संघाला फायनल जिंकता आली नाही. संघामध्ये तोडीस तोड खेळाडूंचा भरणा असूनही संघाला प्रत्येकवेळी अपयश आलं आहे. मात्र आता टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे.

Mission IPL 2024 : अखेर RCB नेही भाकरी फिरवली, टीम मॅनेजमेंटने घेतला मोठा निर्णय
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 04, 2023 | 12:25 PM
Share

मुंबई : आयपीएलमध्ये आतापर्यंत एकदाही विजेतेपद न पटकावणाऱ्या आरसीबीने (Royal Challengers Bangalore) मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधील एकही सीझनमध्ये आतापर्यंत आरसीबी संघाला फायनल जिंकता आली नाही. संघामध्ये तोडीस तोड खेळाडूंचा भरणा असूनही संघाला प्रत्येकवेळी अपयश आलं आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यावर फाफ डू प्लेसिसकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला होता मात्र तरीसुद्धा काही यश आलं नाही. मात्र आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नेमका कोणता निर्णय घेतलाय?

आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नव्या प्रशिक्षकाची निवड करण्यात आली आहे. अँडी फ्लॉवर असं नव्याने निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षकाचं नाव आहे. याआधीचे कोच संजय बांगर आणि माईक हेसन यांचा कार्यकाल संपला आहे. आरसीबीच्या ट्विटर हँडलवर याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

आरसीबीचे ट्विट:-

अँडी फ्लॉवर यांनी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय आणि फँचायझी क्रिकेट संघाचं प्रशिक्षपद सांभाळलं आहे. मुळचे झिम्बाब्बे असलेल्या अँडी फ्लॉवर यांनी पीएसएल, द हंड्रेट, आयएलटी 20, टी-10 या लीगमध्येही प्रशिक्षकपदावर काम केलं आहे. इंग्लंड संघासाठी ते यशस्वी प्रशिक्षक राहिले आहेत. इंग्लंडने 2010 मध्ये टी- 20 वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी ते संघाचे कोच म्हणून कार्यरत होते. आयसीसीकडून हॉल ऑफ फेम होणारे ते झिम्बाब्बेचे पहिले खेळाडू ठरले आहेत.

माईक हेसन आणि संजय बांगर यांचे आभार, गेल्या चार वर्षांमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांनाही यश आलं. या दोघांचा आता कार्यकाळ संपला असून माईक हेसन आणि संजय बांगर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ्या, असं ट्विट करत आरसीबीने दोघांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, आरसीबीने आता आयपीएल 2024 डोळ्यासमोर ठेवत नव्यान संघ बांधणीची तयारी सुरू केली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आतातरी आयपीएलमध्ये आरसीबीला यश येतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?