AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 RCB vs DC Live Streaming : आरसीबी-दिल्ली आमनेसामने, दोघांपैकी एकाचं पॅकअप निश्चित, कोण जिंकणार?

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Live Streaming : आरसीबी आणि दिल्ली दोन्ही संघांसाठी हा सामना आरपारचा असणार आहे.

IPL 2024 RCB vs DC Live Streaming : आरसीबी-दिल्ली आमनेसामने, दोघांपैकी एकाचं पॅकअप निश्चित, कोण जिंकणार?
dc vs rcb iplImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 12, 2024 | 3:41 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 12 मे रोजी 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. दोघांना प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. जिंकणारी टीम स्पर्धेत कायम राहील. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही संघात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

पॉइंट्स टेबलमधील दोन्ही संघांची स्थिती

दिल्ली आणि आरसीबी दोन्ही संघांचा हा 13 वा सामना असणार आहे. दिल्लीने आतापर्यंत या हंगामात 12 सामने खेळले आहेत. या 12 पैकी 6 सामन्यात दिल्लीने विजय मिळवलाय. तर तितक्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. दिल्ली 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर आरसीबी 5 विजय 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. आता उभयसंघांमध्ये आव्हान कायम राखण्यासाठी या सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना केव्हा?

आरसीबी विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामना 12 मे रोजी होणार आहे.

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना कुठे?

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे होणार आहे.

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशक, मयंक डागर, ग्लेन मॅक्सवेल, आकाश दीप, रीस टोपले, टॉम कुरन, अल्झारी जोसेफ, मनोज भंडागे, सौरव चौहान, राजन कुमार आणि हिमांशू शर्मा.

दिल्ली कॅपिटल्स टीम : अक्षर पटेल (कॅप्टन), शाई होप (विकेटकीपर), जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, रसिक दार सलाम, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, सुमित कुमार, ललित यादव, पृथ्वी शॉ, लिझाद विल्यम्स, डेव्हिड वॉर्नर, रिकी भुई, झ्ये रिचर्डसन, ॲनरिक नॉर्टजे, यश धुल, विकी ओस्तवाल आणि स्वस्तिक चिकारा.

Follow Us
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार