IPL 2024, RCB vs SRH : विराट कोहलीचा बाँड्रीवर आपल्याच संघातील खेळाडूने घेतला अप्रतिम झेल, पाहा Video

| Updated on: Apr 25, 2024 | 8:26 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 41 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून बंगळुरुने प्रथम फलंदाजी घेतली. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात एक विराटने एक षटकार मारला आणि स्वत:च्याच टीम मेंबरने अप्रतिम झेल पकडला.

IPL 2024, RCB vs SRH : विराट कोहलीचा बाँड्रीवर आपल्याच संघातील खेळाडूने घेतला अप्रतिम झेल, पाहा Video
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी निवडली आणि विराट-फाफ जोडीने चांगली सुरुवात करून दिली. या सामन्याचा निकाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात पराभव झाला तर प्लेऑफमधील उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात येतील. याची जाणीव असल्याने कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहलीने आक्रमक सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये या दोन्ही खेळाडूंनी दमदार सुरुवात केली. पण चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर नटराजने फाफ डु प्लेसिसला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. नटराजनने ब्रेक मिळवून दिल्याने त्याच्या गोलंदाजीचा दबाव जाणवत होता. मात्र विराट कोहलीने दबाव दूर करण्यासाठी नटराजन टाकत असलेल्या सहाव्या षटकात आक्रमक पवित्रा घेतला. सुरुवातीच्या दोन चेंडूवर एक एक धाव आली. मात्र तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने प्रहार केला आणि चेंडू थेट सीमेपार पाठवला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं डगआऊट तिथेच होतं. तेव्हा आपल्या दिशेने येणारा चेंडू डगआऊटमध्ये बसलेल्या रजत पाटीदारने बरोबर हेरला आणि धाव घेतली. तसेच सीमेच्या पार अप्रतिम झेलं घेतला. या षटकाराची लांबी 83 मीटर इतकी होती. रजत पाटीदारने घेतलेल्या झेलमुळे विराट काही बाद झाला नाही. पण त्या झेलचं कौतुक होत आहे. दुसरीकडे, रजत पाटीदार डगआऊटमध्ये जास्त काळ राहू शकला नाही. विल जॅक्स बाद झाल्याने त्याला मैदानात उतरावं लागलं.

रजत पाटीदारने मैदानात उतरत आक्रमक खेळीचं प्रदर्शन केलं. मार्केंडेनं टाकलेलं 11 वं षटक अक्षरश: फोडून काढलं. एका षटकात 27 धावा आल्या. त्यात 25 धावा एकट्या रजत पाटीदारने काढल्या. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारला. रजत पाटीदारने 19 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन.