AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 | Delhi Capitals टीमचा कॅप्टन निश्चित, ‘या’ खेळाडूकडे जबाबदारी

Delhi Capitals Captain Ipl 2024 | दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या काही तासांआधी आपल्या कॅप्टनच्या नावाची घोषणा केली आहे. डेव्हिड वॉर्नर की ऋषभ पंत? कुणाला मिळाली जबाबदारी?

IPL 2024 | Delhi Capitals टीमचा कॅप्टन निश्चित, 'या' खेळाडूकडे जबाबदारी
| Updated on: Mar 19, 2024 | 11:02 PM
Share

मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाला अवघे काही तास शिल्लक असताना दिल्ली कॅपिट्ल्सने टीमने मोठी घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने आपल्या टीमच्या कॅप्टनची घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन कोण असणार? अशी चर्चा सुरु होती. मात्र दिल्लीने अखेर घोषणा केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

ऋषभ पंत हाच दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. ऋषभच्या अपघातानंतर त्याला 16 व्या मोसमाला मुकावं लागलं होतं. ऋषभच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्लीची धुरा सांभाळली. मात्र 17 व्या मोसमाआधी ऋषभ पंत सर्व सोपस्कार पार पडून 17 व्या मोसमासाठी फिट झाला. मात्र त्यानंतरही कॅप्टन्सीसाठी डेव्हिड वॉर्नर याचं नाव शर्यतीत होतं. त्यामुळे पंत आणि वॉर्नर या दोघांपैकी कुणाला जबाबदारी मिळणार? अशी चर्चा होती. मात्र दिल्ली कॅपिट्ल्सने पंतवर विश्वास दाखवत आपला कॅप्टन कायम ठेवला आहे. त्यामुळे आता पंत पुन्हा एकदा नेतृत्वात करताना दिसणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्सच्या सामन्यांचं वेळापत्रक

दरम्यान आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने लोकसभा निवडणुकांमुळे 17 व्या मोसमाचं पहिल्या टप्प्प्यातील 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने पार पडणार आहेत. त्यानुसार प्रत्येक टीमन किमान 3 आणि कमाल 5 सामने खेळणार आहे. दिल्ली कॅपिट्ल्स एकूण 5 सामने खेळणार आहे. दिल्ली आपला पहिला सामना 17 व्या हंगामातील दुसऱ्याच दिवशी अर्थात 23 मार्च रोजी पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे. तर पाचवा सामना हा 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पार पडेल.

ऋषभ पंत हाच कॅप्टन

आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिट्ल्स टीम | ऋषभ पंत (कॅप्टन), अभिषेक पोरेल, रिकी भुई, हॅरी ब्रूक, यश धूल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, डेविड वार्नर, ललित यादव, मिचेल मार्श, अक्षर पटेल, सुमित कुमार, खलील अहमद, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, मुकेश कुमार, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्तजे, विक्की ओस्तवाल, रसिख सलाम, झाय रिचर्डसन, ईशांत शर्मा, स्वास्तिक चिकारा आणि कुमार कुशाग्र.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.