IPL 2024 RR vs DC Live Streaming : 2 विकेटकीपर कॅप्टन आमनेसामने, कोण जिंकणार?

| Updated on: Mar 28, 2024 | 3:01 PM

Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Streaming : आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज 28 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स असा सामना होणार आहे.

IPL 2024 RR vs DC Live Streaming : 2 विकेटकीपर कॅप्टन आमनेसामने, कोण जिंकणार?
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील नवव्या सामन्यात 2 विकेटकीपर कॅप्टन आमनेसामने असणार आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स भिडणार आहेत. संजू समॅसन-ऋषभ पंत हे दोघे विकेटकीपर कॅप्टन यांचा आमनासामना होणार आहे. दोघेही अनुभवी खेळाडू आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना आहे. संजूच्या नेतृत्वात राजस्थानने विजयी सुरुवात केली. तर 453 दिवसांनी परतलेल्या ऋषभ पंत दिल्लीला विजयी सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरला. त्यामुळे दिल्ली एका बाजूला आपल्या विजयाच्या प्रतिक्षेत असणार आहे. तर राजस्थान विजयी घोडदौड कायम राखण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

राजस्थानने 24 मार्च रोजी लखनऊवर 20 धावांनी मात करुन पहिल्याच सामन्यात विजय नोंदवला. तर दिल्लीला पंजाबकडून 23 मार्चला 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. तर राजस्थान दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. राजस्थान विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्याबाबत सर्वकाही जाणून घेऊयात.

राजस्थान विरुद्ध दिल्ली सामना केव्हा?

राजस्थान विरुद्ध दिल्ली सामना आज गुरुवारी 28 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

राजस्थान विरुद्ध दिल्ली सामना कुठे?

राजस्थान विरुद्ध दिल्ली सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलंय.

राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजा टॉस होईल.

राजस्थान विरुद्ध दिल्ली सामना मोबाईल आणि टीव्हीवर कुठे पाहता येईल?

राजस्थान विरुद्ध दिल्ली सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल. तर टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर विविध भाषांमध्ये सामना पाहता येईल.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, नांद्रे बर्गर, रोवमन पॉवेल, तनुष कोटीयन, शुभ कोट दुबे, कुलदीप सेन, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर, प्रसिध कृष्णा, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक आणि कुणाल सिंग राठौर.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार, जेक फ्रेजर-मॅकगुर्क) , विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे, झाय रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, पृथ्वी शॉ, ललित यादव, रसिक दार सलाम, कुमार कुशाग्रा, यश धुल आणि स्वस्तिक चिकारा.