
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 24 वा सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व सांभाळणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सचं कर्णधारपद असणार आहे. राजस्थानचा हा पाचवा आणि गुजरातचा सहावा सामना असणार आहे. राजस्थानने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. राजस्थान 8 पॉइंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहेत. तर गुजरातने 5 पैकी 2 सामन्यात विजय मिळवलाय. तर 3 मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघांनी गुजरातचा धुव्वा उडवलाय. त्यामुळे आता गुजरातसमोर राजस्थानचा विजयी रथ रोखण्याचा आव्हान असणार आहे.
राजस्थान विरुद्ध गुजरात सामना बुधवारी 10 एप्रिल रोजी होणार आहे.
राजस्थान विरुद्ध गुजरात सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये होणार आहे.
राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
राजस्थान विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.
राजस्थान विरुद्ध गुजरात सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येईल.
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर , युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.
गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कॅप्टन), डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शना नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथार.