RR vs MI Toss : राजस्थान विरुद्ध मुंबईने टॉस जिंकला, हार्दिक पंड्याचा मोठा निर्णय

| Updated on: Apr 22, 2024 | 7:39 PM

Rajasthan Royals vs Mumbai Indians Toss Update : राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या 17 व्या मोसमात पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि मुंबई इंडियन्स सातव्या स्थानी आहे.

RR vs MI Toss : राजस्थान विरुद्ध मुंबईने टॉस जिंकला, हार्दिक पंड्याचा मोठा निर्णय
mi vs rr toss ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं आणि संजू सॅमसन राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईने टॉस जिंकला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

पलटणला इतिहास बदलण्याची संधी

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये 1 एप्रिल रोजी सामना झाला होता. तेव्हा राजस्थानने मुंबईवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता मुंबईकडे राजस्थानला त्यांच्या घरात पराभूत करण्यासह इतिहास बदलण्याची संधी आहे. मुंबईला गेल्या 12 वर्षांपासून जयपूरमध्ये सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे मुंबईकडे राजस्थानचा हिशोब क्लिअर करण्यासह इतिहास बदलण्याची दुहेरी संधी आहे.

मुंबई राजस्थानवर वरचढ

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स दोन्ही संघ आयपीएलमध्ये एकूण 29 वेळा आमनेसामने आले आहेत. या 29 पैकी सर्वाधिक सामन्यात मुंबई वरचढ राहिली आहे. मुंबईने 15 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानला 13 सामन्यात यश आलं आहे.

टॉस मुंबईने जिंकला, मॅच जिंकणार का?

मुंबईमध्ये 3 राजस्थानमध्ये 1 बदल

दरम्यान मुंबई आणि राजस्थान या दोन्ही संघांनी या सामन्यात बदल केले आहेत. मुंबईने 3 तर राजस्थानने 1 बदल केला आहे. मुंबईने आकाश मधवाल, रोमारियो शेफर्ड आणि श्रेयस गोपाळ या तिघांना बाहेर बसवलं आहे. तर त्याऐवजी नुवान तुषारा, नेहल वढेरा आणि पीयूष चावला यांचा समावेश केला आहे. तर राजस्थानच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुलदीप सेन याच्या जागी संदीप शर्मा याची एन्ट्री झाली आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन :  संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.