
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 19 व्या सामन्यात स्पर्धेतील अजिंक्य असलेली राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आमनासामना होणार आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत संजू सॅमसन याच्या नेतृत्वात खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला 4 सामने खेळलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला फक्त 1 मॅचच जिंकता आली आहे. तर 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे बंगळुरुसमोर दुसरा विजय मिळवून राजस्थानचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना शनिवारी 6 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
राजस्थान टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.
बंगळुरु टीम : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), यश दयाल, विजयकुमार विशक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल विल लोमर, जॅक्स, कॅमेरॉन ग्रीन, टॉम कुरन, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत.