AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 SRH vs PBKS Live Streaming: पंजाब पराभवाचा वचपा घेणार का? हैदराबाद विरुद्ध दुसऱ्यांदा आमनेसामने

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Streaming : पंजाब विरुद्ध हैदराबाद दोन्ही संघ 9 एप्रिलनंतर या 17 व्या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. कोण जिंकेल सामना?

IPL 2024 SRH vs PBKS Live Streaming: पंजाब पराभवाचा वचपा घेणार का? हैदराबाद विरुद्ध दुसऱ्यांदा आमनेसामने
pbks vs srh arshdeep singh ipl 2024Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 18, 2024 | 3:57 PM
Share

आयपीएलचा 17 वा मोसम अखेरच्या टप्प्यात आहे. प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे 3 संघ प्लेऑफमध्ये पोहचले आहेत. तर आता एका जागेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. या दोघांपैकी जिंकणारा संघ प्लेऑफमध्ये पोहचेल. तर दुसऱ्या बाजूला रविवारी या हंगामातील अखेरचा डबल हेडर पार पडणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या आणि हंगामातील 69 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

हैदराबाद विरुद्ध पंजाब सामना केव्हा?

हैदराबाद विरुद्ध पंजाब सामना रविवारी 19 मे रोजी होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध पंजाब कुठे?

हैदराबाद विरुद्ध पंजाब सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद येथे होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध पंजाब सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

हैदराबाद विरुद्ध पंजाब सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

हैदराबाद विरुद्ध पंजाब सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

हैदराबाद विरुद्ध पंजाब सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

हैदराबाद विरुद्ध पंजाब सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

हैदराबाद विरुद्ध पंजाब सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.

पंजाब किंग्स टीम : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा, सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.