
आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान मुंबई इंडियन्सच्या गोटातून आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या चाहत्यांना गेले अनेक दिवस ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे. अनेक दिवसांनी अखेर मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमार यादव यााची एन्ट्री झाली आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. “आपला दादूस आला रे”, अशा कॅप्शनसह मुंबई इंडियन्सने सूर्याचा फोटो पोस्ट केलाय. सूर्या परतल्याने आतातरी मुंबई पहिला विजय मिळणार का? असा प्रश्नही सूर्याच्या कमबॅकमुळे उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आता सूर्यकुमार यादव याच्या एन्ट्रीमुळे प्लेईंग ईलेव्हनमधून कुणा एकाचा तरी पत्ता कट होणार आहे. सूर्याच्या अनुपस्थितीत पहिल्या 3 सामन्यांमध्ये नमन धीर याला संधी देण्यात आली. नमन धीर याने 3 सामन्यात 50 धावा केल्या.नमनला संधी मिळाली, मात्र त्याला छाप सोडता आली नाही.
आपला दादूस आला रे
आपला दादूस आला रे! 😍💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @surya_14kumar pic.twitter.com/0ZJldXIqE2
— Mumbai Indians (@mipaltan) April 5, 2024
सूर्यकुमार यादव याने 2012 साली आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध पदार्पण केलं. सूर्याने तेव्हापासून ते 16 व्या हंगामापर्यंत एकूण 139 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 51 अर्धशतकांसह 2 हजार 267 धावा केल्या आहेत. तसेच
सूर्यकुमार यादव याने टीम इंडियाचं 1 कसोटी, 37 एकदिवसीय आणि 60 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. सूर्याने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 8, 773 आणि 2 हजार 141 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.