CSK vs RCB | श्वास तर घेऊ दे….जाडेजावर का भडकला विराट कोहली? VIDEO

एमएस धोनी रवींद्र जाडेजाला काही बोलला, तर समजून घेऊ शकतो. आयपीएलमध्ये दोघेही एकाच टीमकडून खेळतात. पण RCB कडून खेळणारा विराट कोहली जेव्हा जाडेजा बरोबर असं वागतो, तेव्हा आश्चर्य वाटतं. IPL 2024 च्या ओपनिंग मॅच दरम्यान काय झालं? विराटने असं का केलं?

CSK vs RCB | श्वास तर घेऊ दे....जाडेजावर का भडकला विराट कोहली? VIDEO
IPL 2024
| Updated on: Mar 23, 2024 | 1:52 PM

CSK आणि RCB दम्यान IPL 2024 मधील सलामीचा सामना झाला. सीएसकेने ही मॅच 6 विकेटने जिंकली. पण या मॅच दरम्यान असं काय झालं की, विराट कोहली रवींद्र जाडेजावर भडकला. विराट जाडेजावर भडकून म्हणाला की, श्वास तर घेऊ दे. RCB च्या इनिंगची 11 वी ओव्हर सुरु होती, त्यावेळी ही घटना घडली. विराट कोहलीसोबत कॅमरुन ग्रीन क्रीजवर होता. विराट आणि ग्रीनची जोडी विकेटवर RCB साठी धावा बनवण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी गोलंदाजी करणाऱ्या रवींद्र जाडेजावर विराट कोहली भडकला. विराट जे काही बोलला, ते स्टम्पच्या माइकमध्ये कैद झालं. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. मोठा प्रश्न हा आहे की, विराट जाडेजाला असं का बोलला?

RCB च्या इनिंग दरम्यान विराट कोहली रवींद्र जाडेजाला जे काही बोलला, ते असं आहे. अरे, त्याला श्वास तर घेऊ दे. जाडेजा वेगाने आपली ओव्हर पूर्ण करण्याच्या मागे लागला होता, त्यावेळी विराट हे म्हणाला. विराटला असं वाटलं की, जाडेजा कॅमरुन ग्रीनला क्रीजवर सेट होण्याचा वेळ देत नाहीय. त्याचा स्ट्रगल सुरु होता.


त्यानंतरच्या ओव्हरमध्ये विराट आणि ग्रीन दोघेही क्रीजवर नव्हते

विराट आणि जाडेजामध्ये हे बोलण झालं, त्यानंतरच्या ओव्हरमध्ये विराट आणि ग्रीन दोघेही क्रीजवर नव्हते. दोघेही त्यानंतरच्या 12 व्या ओव्हरमध्ये आऊट होऊन डगआऊटमध्ये गेले. मुस्तफिजुर रहमानने दोघांचा विकेट घेतला. डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुरला पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर विराटचा विकेट मिळाला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने ग्रीनला बाद केलं. विराट कोहलीने 21 तर कॅमरुन ग्रीनने 18 धावा केल्या.