
आयपीएल 2025 मधील 29 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. दिल्लीचा हा या मोसमातील पाचवा तर मुंबईचा सामना आहे. दिल्लीने सलग आणि एकूण 4 सामने जिंकले आहेत. तर मुंबईने 5 पैकी फक्त 1 सामना जिंकलाय. तर मुंबई 4 वेळा पराभूत झालीय. अशात आता मुंबईला पराभवाची साखळी तोडायची असेल आणि जिंकायचं असेल तर पलटणच्या 5 खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याशिवाय गत्यंतर नाही. मुंबई जिंकणार की पराभूत होणार? हे या 5 खेळाडूंच्या कामगिरीवर ठरणार आहे. ते 5 जण कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
मुंबईचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याला या मोसमात आतापर्यंत काही खास करता आलेलं नाही. रोहितने 4 सामन्यांमधील 4 डावात 38 धावाच केल्या आहेत. मात्र कमबॅकसाठी एक खेळी पुरेशी असते. त्यामुळे रोहितची बॅट जर चालली तर मुंबईचा विजय निश्चित समजायला काहीही हरकत नाही.
मुंबईचा युवा आणि डॅशिंग फलंदाज तिलक वर्मा याने 5 सामन्यांमधील 4 डावात 1 अर्धशतकासह 151 धावा केल्या आहेत. तिलककडून वादळी खेळीची अपेक्षा असणार आहे.
मुंबईसाठी या मोसमात आतापर्यंत सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सूर्याने 5 डावांमध्ये 1 अर्धशतकासह 150.75 स्ट्राईक रेटने एकूण 199 धावा केल्या आहेत. त्यामुळे सूर्याकडून पलटणला मोठ्या आणि तडखेदार खेळी अपेक्षित आहे.
हार्दिक पंड्याने बॉलिंग आणि बॅटिंगने योगदान देत आहे. मात्र हार्दिककडून कर्णधार म्हणून आणखी चांगली कामगिरी अपेक्षित आहे. हार्दिकने 4 सामन्यांमधील 3 डावात 81 धावा केल्या आहेत. हार्दिककडे कॅप्टन्सीसह बॅटिंग आणि बॉलिंग अशी तिहेरी जबाबदारी आहे.
मुंबईच्या गोलंदाजाची कणा असलेल्या जसप्रीत बुमराह याने दुखापतीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यातून कमबॅक केलं. बुमराहला पहिल्या सामन्यात विकेट घेता आली नाही. त्यामुळे आता बुमराहने आपली चमक दाखवत विकेट्स घ्याव्यात आणि धावांवर ब्रेक लावावा, अशी आशा टीम मॅनेजमेंटला असणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.