
आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची विजयी घोडदौड सुरु आहे. कर्णधार अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 6 गुणांसह टॉपला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहाव लागलं आहे. गुणतालिकेत बंगळुरु संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये राहण्यासाठी आरसीबीची लढत असणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दोन संघांचा सामना होणार आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू गुरुवारी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सशी सामना करणार आहे.आरसीबीचा संघ हंगामात घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
आयपीएल 2025 च्या 24 व्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत 32 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यात आरसीबीने 19, तर दिल्ली कॅपिटल्सने 11 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला.आयपीएल 2012 मध्ये आरसीबीने दिल्लीविरुद्ध 215 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 12 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी आरसीबीने 7 सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरूमध्ये आरसीबीविरुद्ध फक्त 4 सामने जिंकले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सिंगल बेंगलोर, स्वैपाक बेंगळुरू, स्वैपाक बेंगलुरु, रसिक दार सिंगल रोमारियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग.
दिल्ली कॅपिटल्स संघ: जेक फ्रेझर-मॅकगुर्क, केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, करुण नायर, दर्शना दोरा, दर्शना दुना, दर्शना डुक्कर, टी. नटराजन, त्रिपुराण विजय, दुष्मंथा चमीरा, अजय जाधव मंडल, मानवंथ कुमार एल, माधव तिवारी.