GT vs RR : गुजरातविरुद्धच्या सामन्यात घोडचूक, राजस्थानच्या खेळाडूंवर बीसीसीआयची मोठी कारवाई

Gujarat Titans vs Rajasthan Royals : गुजरात टायटन्सविरुद्ध पराभूत झाल्यानंतर बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सला मोठा दणका दिला आहे. नक्की काय झालंय? जाणून घ्या सविस्तर.

GT vs RR : गुजरातविरुद्धच्या सामन्यात घोडचूक, राजस्थानच्या खेळाडूंवर बीसीसीआयची मोठी कारवाई
Rajasthan Royals Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 10, 2025 | 4:31 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला यजमान गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. गुजरातने राजस्थानवर 58 धावांच्या फरकाने विजय मिळवला. गुजरातचा हा या मोसमातील एकूण आणि सलग चौथा पराभव ठरला. राजस्थानला या पराभवानंतर आणखी एक झटका लागला आहे. बीसीसीआयने राजस्थानच्या खेळाडूंना दणका दिला आहे. बीसीसीआयने कर्णधार संजू सॅमसन याच्यासह इतर खेळाडूंवरही कारवाई केली आहे. राजस्थानच्या खेळाडूंकडून आयपीएल स्पर्धेतील आचार संहितेचं उल्लंघन झालं आहे.

राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आवश्यक ओव्हर रेट राखता आला नाही. बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटमुळे राजस्थानवर ही कारवाई केली आहे. आयपीएल आचार संहितेच्या अनुच्छेद 2.22 नुसार राजस्थानकडून अशी चूक होण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी राजस्थानकडून गेल्या महिन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध गुवाहाटीतील बारसपारा स्टेडियममध्ये अशीच चूक झाली होती. तेव्हाही बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली होती. रियान पराग चेन्नईविरुद्ध राजस्थानचं नेतृत्व करत होता. कर्णधार या नात्याने रियानला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

सर्व खेळाडूंवर कारवाई

दरम्यान बीसीसीआयने कर्णधार संजू सॅमसन याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच इमपॅक्ट प्लेअरसह प्लेइंग ईलेव्हनमधील इतर खेळाडूंना 6 लाख किंवा मॅच फी पैकी 25 टक्के रक्कम दंड द्यावा लागणार आहे, अशी माहिती आयपीएलकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

बीसीसीआयची राजस्थान रॉयल्सवर मोठी कारवाई

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.