IPL 2025 : केकेआरकडून रहाणेसमोर वेंकटेश अय्यरला नेतृत्व, 18 व्या मोसमाआधी मोठा ‘गेम’

IPL 2025 KKR : आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटात 2 कर्णधार पाहायला मिळाले. केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही अजिंक्य रहाणेकडे आहे. मात्र उपकर्णधार वेंकटेश अय्यर याला कर्णधार करण्यात आलं. जाणून घ्या.

IPL 2025 : केकेआरकडून रहाणेसमोर वेंकटेश अय्यरला नेतृत्व, 18 व्या मोसमाआधी मोठा गेम
Ajinkya Rahane and Venkatesh Iyer
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 16, 2025 | 7:05 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. हंगामातील सलामीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. गतविजेत्या कोलकातासमोर यंदा ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. केकेआरने या हंगामासाठी जोरदार सराव केला आहे. केकेआर यंदा नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. अजिंक्य रहाणे याला कोलकाताचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. तर वेंकटेश अय्यर याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. मात्र या हंगामाआधी वेगळंच काही पाहायला मिळालं. केकेआरने रहाणेसमोर वेंकटेश अय्यर याला कर्णधार केलं.

आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी सरावाच्या दृष्ट्रीने इंट्रा स्क्वॉड मॅच खेळवण्यात आली. या सामन्यासाठी केकेआरमधील खेळाडंना 2 संघात विभागण्यात आलं. रहाणेला पर्पल कॅप संघाचं कर्णधार करण्यात आलं. तर वेंकटेशला गोल्ड टीमंचं कर्णधारपद देण्यात आलं. या हायस्कोअरिंग सामन्यात केकेआरच्या मोठ्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. वेंकटेश अय्यर, रिंकु सिंह आणि आंद्रे रसेल या त्रिकुटाने स्फोटक खेळी केली.

सामन्यात काय झालं?

या इंट्रा स्क्वॉड सामन्यात टीम गोल्डने पहिले बॅटिंग केली. वेंकटेशच्या नेतृत्वात टीम गोल्डने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. वेंकटेशने 26 चेंडूत 61 धावांची झंझावाती खेळी केली. तसेच लवनिथ सिसोदिया याने 24 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. तर रमनदीप सिंह याने 13 चेंडूत नॉट आऊट 27 रन्स केल्या.

प्रत्युत्तरात रहाणेच्या टीम पर्पलने 216 धावांचं आव्हान हे 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. क्विंटन डी कॉक, रिंकु सिंह आणि आंद्र रसेल हे स्फोटक त्रिकुट टीम पर्पलच्या विजयाचे शिल्पकार ठरले. रिंकूने सर्वाधिक धावा केल्या. रिंकून फक्त 33 बॉलमध्ये 77 रन्स केल्या. आंद्रे रसेल याने 23 बॉलमध्ये नॉट आऊट 59 रन्स केल्या. तसेच क्विंटन डी कॉक याने 22 चेंडूत 52 धावा केल्या.

पाहा संपूर्ण सामना

कोलकाता नाइट रायडर्स टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार) सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमनदीप सिंह, रिंकू सिंह,वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्खिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडेय, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉनसन, अनुकूल रॉय, उमरान मलिक, मोईन अली आणि लवनीथ सिसोदिया.