Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR : 47 चेंडूत 107 धावा, गतविजेता केकेआरच्या फलंदाजाची स्फोटक खेळी

IPL 2025 KKR : आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी कोलकाताच्या स्फोटक फलंदाजाने सराव सामन्यात वादळी खेळी केलीय. या फलंदाजाने यासह आपण 18 व्या हंगामासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलंय.

KKR : 47 चेंडूत 107 धावा, गतविजेता केकेआरच्या फलंदाजाची स्फोटक खेळी
venkatesh iyer kkr iplImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 18, 2025 | 5:32 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू भाग्यवान ठरले. काही खेळाडूंची पहिल्यांदाच निवड झाली. तर काही खेळाडू पहिल्याच झटक्यात कोट्याधीशही झाले. वैभय सूर्यवंशी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा कोट्याधीश खेळाडू ठरला. तसेच ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मेगा ऑक्शननंतर या 18 व्या मोसमाचं वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आलं. त्यानुसार आता 22 मार्चपासून या हंगामाचा थरार रंगणार आहे. त्याआधी प्रत्येक संघ जोरदार सराव करत आहेत. या स्पर्धेआधी केकेआरचा ओपनर आणि उपकर्णधार वेंकटेश अय्यर याने स्फोटक शतकी खेळी करत प्रतिस्पर्धा संघांना ट्रेलर दाखवला आहे. वेंकटेश अय्यर याने सराव सामन्यात ही शतकी खेळी केली.

वेंकटेश अय्यर चमकला

या 18 व्या मोसमातील सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना गतविजेता कोलकाता टीमचा होमग्राउंड असलेल्या ईडन गार्डनमध्ये होणार आहे. त्याआधी केकेआर टीम आपआपसात सराव सामने खेळत आहे. उपकर्णधार वेंकटेश अय्यर याने या सराव सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजीचा ट्रेलर दाखवून दिला.

वेंकटेशची स्फोटक खेळी

वेंकटेश अय्यर याने दोन्ही सराव सामन्यांत झंझावाती खेळी केली. वेंकटेशने पहिल्या सराव सामन्यात 26 बॉलमध्ये 61 रन्स केल्या. वेंकटेश त्यानंतर रिटार्यड आऊट झाला. त्यानंतर वेंकटेशने दुसऱ्या सराव सामन्यात 21 बॉलमध्ये 46 धावा जोडल्या. वेंकटेशने अशाप्रकारे दोन्ही सामन्यातील एकूण 47 चेंडूत 107 धावा केल्या. वेंकटेशने यासह टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर दाखववेला विश्वास सार्थ ठरवला. केकेआरने वेंकटेशसाठी 23 कोटी 75 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. वेंकटेश 18 व्या मोसमात केकेआरसाठी पैसावसूल खेळी करेल, अशी आशा टीम मॅनजमेंटला असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्खिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडेय, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉनसन, अनुकूल रॉय, उमरान मलिक, मोईन अली आणि लवनीथ सिसोदिया.

मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मागणी काय?
मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मागणी काय?.
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले.
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.