KKR vs LSG : नाणेफेकीचा कौल कोलकात्याच्या बाजूने, कर्णधार अजिंक्य रहाणेने घेतला असा निर्णय
आयपीएल 2025 स्पर्धेतील 21वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेतील 21 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘आपण प्रथम गोलंदाजी करणार आहोत. विकेट खरोखरच चांगली दिसतेय, ती तितकी गरम नाहीये. विकेटमध्ये फारसा बदल होणार नाही. एका बाजूची सीमारेषा लहान आहे, म्हणूनच आपण प्रथम गोलंदाजी करत आहोत. प्रत्येकजण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. हा सामना नवीन सुरुवात करण्याबद्दल आहे, सकारात्मक गोष्टी घेण्याची गरज आहे, एका वेळी एक पाऊल उचलण्याची गरज आहे. लोक याबद्दल बोलणार आहेत, आम्हाला माहित आहे की क्विनी आणि सुनील हे सामना जिंकणारे आहेत. आम्हाला त्यांची काळजी नाही. मोईनच्या जागी स्पेन्सर आला आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, खूप आनंदी आहे असे म्हणणार नाही. भूतकाळाबद्दल जास्त विचार करत नाही. सकारात्मक बाबींचा विचार करून पुढे जाईन. एक संघ म्हणून आपण जिंकत आहोत आणि कर्णधार म्हणून मी आनंदी आहे. आपण त्याच प्लेइंग इलेव्हनसह खेळत आहोत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी
