
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 30 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात गुरु-शिष्य यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करणार आहे. तर महेंद्रसिंह धोनी याच्याकडे चेन्नई सुपर किंगसच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे अनुभवी धोनीसमोर तुलनेने नवख्या पंतच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
लखनौ आणि चेन्नई दोन्ही संघांचा हा या मोसमातील सातवा सामना असणार आहे. लखनौने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तसेच लखनौने गेल्या 3 सामन्यात सलग विजय मिळवला आहे. तर दुसर्या बाजूला चेन्नईने सलग 5 सामने गमावले आहेत. त्यामुळे चेन्नईसमोर पराभवाची मालिका खंडीत करण्याचं आव्हान असणार आहे. तर लखनौचा सलग 3 विजयांमुळे विश्वास दुणावलेला आहे. अशात आता दोघांपैकी कोण वरचढ ठरतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लखनौ विरुद्ध चेन्नई सामना सोमवारी 14 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
लखनौ विरुद्ध चेन्नई सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमम, लखनौ येथे आयोजित करण्यात आला आहे.
लखनौ विरुद्ध चेन्नई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
लखनौ विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.
लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.
चेन्नई सुपर किंग्ज संघ: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.