
आयपीएल 2025 स्पर्धेतील 29वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. यानंतर कर्णधार अक्षर पटेल क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी करणार असल्याचं म्हणाला. मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीला उतरावं लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आपण चांगला पाठलाग करत आहोत आणि या हंगामात येथे पहिलाच सामना आहे त्यामुळे खेळपट्टी कशी खेळेल हे माहित नाही. भूतकाळातील आकडेवारीवर जास्त विश्वास ठेवू नका. आव्हान म्हणजे योजनेचे योग्यरित्या पालन करणे आणि षटकार मारला तरी धाडसी राहणे गरजेचं आहे. फाफ जखमी आहे. पण तीच प्लेइंग 11 आहे.’
हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘आपण कुठे चुका करतोय याबद्दल चर्चा सुरू आहे. या गटात अनुभवाची कमतरता नाही. आपण चांगला खेळ करण्यापासून फार दूर नाही. आपण घाबरू नये म्हणून प्रयत्न करत आहोत. घाबरून काही फायदा होत नाही. आपल्याकडे चुकांची फारशी शक्यता नाही, आशा आहे की आज रात्री सर्व काही चांगले होईल. तीच टीम घेऊन उतरणार आहोत.’
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.