MI vs LSG : मुंबईसमोर 229 धावांचं आव्हान, लखनौ जिंकणार की पलटण वानखेडेत मैदान मारणार?
Mumbai Indians vs Lucknow Super Giants, 1st Inning : लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी वानखेडे स्टेडियममध्ये जबरदस्त बॅटिंग केली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी निर्णायक वेळी झटके देत लखनौला आणखी मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं.

पाहुण्या लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससमोर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 47 व्या सामन्यात 229 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लखनौने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 228 धावा केल्या आहेत. लखनौसाठी वानखेडे स्टेडियममध्ये एकूण 7 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठता आला. त्यामुळे लखनौला सहज 220 पार मजल मारता आली. लखनौसाठी तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या निकोलस पूरन याने सर्वाधिक धावा केल्या. तसेच इतर फलंदाजांनी योगदान दिलं. लखनौसाठी दुसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी झाली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत लखनौला मोठ्या धावसंख्येपासून यशस्वीरित्या रोखलं. त्यामुळे आता पलटण हे आव्हान पूर्ण करते का याकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.
हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या बाजूने टॉसचा कौल लागला. सूर्याने फिल्डिंगचा निर्णय घेत लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. जोश इंग्लिस आणि मिचेल मार्श या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 29 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर अल्लाह गजनफर याने जोश इंग्लिसला आऊट करत लखनौला पहिला झटका दिला. जोशने इंग्लिसला 13 रन्सवर आऊट केलं.
कॉर्बिन बॉशकडून एकाच ओव्हरमध्ये 2 झटके
त्यानंतर निकोलस पूरन आणि मिचेल मार्श या जोडीने कमाल केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 34 बॉलमध्ये 94 रन्सची पार्टनरशीप केली. पूरनने या दरम्यान मुंबईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. या पार्टनरशीपमुळे लखनौला बुस्टर मिळाला. मुंबईसाठी ही जोडी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा कॉर्बिन बॉश याने कमाल केली. कॉर्बिनने एकाच ओव्हरमध्ये लखनौला 2 झटके देत लखनौच्या धावसंख्येला ब्रेक लावला.
निकोलस पूरन याने 21 बॉलमध्ये 300 च्या स्ट्राईक रेटने 63 रन्स केल्या. पूरनने या दरम्यान 8 सिक्स आणि 1 फोर लागवला. कॉर्बिनने निकोलसननंतर मिचेल मार्श यालाही आऊट केलं. मार्शने 25 चेंडूत 44 रन्स केल्या. कॅप्टन ऋषभ पंत याने 15 आणि अक्षत रघुवंशी याने 11 धावा केल्या.
लाईव्ह स्कोअरकार्ड
तसेच एडन मार्करम आणि हिमंत सिंह ही जोडी नाबाद परतली. एडन आणि हिमंत या दोघांनी 47 बॉलमध्ये 68 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. एडनने 25 बॉलमध्ये नॉट आऊट 31 रन्स केल्या. तर हिंमत सिंग याने 31 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. हिंमतने या दरम्यान 2 सिक्स आणि 2 फोर लगावले. मुंबईकडून कॉर्बिन बॉश याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर जसप्रीत बुमराह, रघु शर्मा आणि विल जॅक्स या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.