AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG Toss : कॅप्टन हार्दिक आऊट, सूर्या कॅप्टन, मुंबईची लखनौ विरुद्ध फिल्डिंग

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Toss : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमेनसामने येण्याची पहिलीच वेळ आहे.

MI vs LSG Toss : कॅप्टन हार्दिक आऊट, सूर्या कॅप्टन, मुंबईची लखनौ विरुद्ध फिल्डिंग
Suryakumar Yadav MI vs LSG Toss IPL 2026Image Credit source: Social Media
| Updated on: May 04, 2026 | 7:20 PM
Share

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल 2026 स्पर्धेत आज 4 मे रोजी 47 व्या सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात होम टीम मुंबई इंडियन्ससमोर लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. दोन्ही संघांची या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. लखनौला 8 पैकी 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये या हंगामात 5 पैकी सलग 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे मुंबई तिसरा विजय मिळवण्यासह वानखेडेतील पराभवाची मालिका खंडीत करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईने टॉस जिंकला

मुंबई विरुद्ध लखनौ सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबई/लखनौच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने बॉलिंगचा निर्णय घेत लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

रोहित शर्माचं कमबॅक

ऑलराउंडर हार्दिक पंड्या मुंबईचा नियमित कर्णधार आहे. मात्र हार्दिकची तब्येत बरी नसल्याने त्याला लखनौ विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे, अशी माहिती हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादव याने दिली आहे. तसेच रोहित शर्मा याचं कमबॅक झालं आहे. मात्र मुंबईची दुसऱ्या डावात बॅटिंग असल्याने रोहित इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. त्यामुळे रोहित कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहितला आरसीबी विरुद्ध झालेल्या दुखापतीनंतर बऱ्याच सामन्यांना मुकावं लागलं होतं.

वानखेडेतील आकडेवारी

वानखेडे स्टेडियममध्ये 2026 वर्षांत आतापर्यंत एकूण 13 सामने खेळवण्यात आले आहेत. या 13 पैकी 7 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. तर 6 वेळा चेजिंग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हा नववा सामना असणार आहे. याआधी उभयसंघात 8 सामने खेळवण्यात आले आहेत. लखनौ या 8 पैकी सर्वाधिक सामन्यांत मुंबईवर वरचढ राहिली आहे. लखनौने मुंबईला 6 सामन्यांत पराभूत केलं आहे. तर मुंबईला केवळ 2 सामनेच जिंकता आले आहेत.

मुंबई आणि लखनौची सारखीच स्थिती

मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र मुंबईची या मोसमात आतापर्यंत सुमार कामगिरी राहिली आहे. मुंबईने या हंगामात 9 पैकी 7 सामने गमावले आहेत. तर मुंबईला केवळ 2 सामनेच जिंकता आले आहेत. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे. तर लखनौने 8 पैकी 2 सामन्यांत प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे. लखनौ पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून पहिल्या अर्थात दहाव्या क्रमांकावर आहे.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श, एडन मार्करम, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, मोहसीन खान, आवेश खान आणि प्रिन्स यादव.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर आणि रघु शर्मा.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!