MI vs RCB: जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पण रोहित शर्मा आणि तिलक वर्माबाबत हार्दिक म्हणाला..

आयपीएल 2025 स्पर्धेतील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तसेच संघात जसप्रीत बुमराहचं कमबॅक झालं आहे.

MI vs RCB: जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पण रोहित शर्मा आणि तिलक वर्माबाबत हार्दिक म्हणाला..
Image Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Apr 07, 2025 | 7:20 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स पाचवा सामना खेळत आहे. मागच्या चार पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या कमबॅककडे लक्ष लागून होतं. अखेर जसप्रीत बुमराहचं कमबॅक झाल्याने जीव भांड्यात पडला आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘आपण प्रथम गोलंदाजी करणार आहोत. हा खेळपट्टी चांगली दिसतेय, नंतर दव येऊ शकते. जेव्हा खेळपट्टी थंड असते तेव्हा चांगली राहते. जेव्हा दव पडतो तेव्हा ती अधिक चांगली होते. दोन्ही संघांसाठी ते नेहमीच चांगले खेळते. आता आपल्याला लय मिळवण्याची, चांगले क्रिकेट खेळण्याची, हुशार पर्याय निवडण्याची आणि योग्य गोष्टी करण्याची वेळ आली आहे. मुंबई नेहमीच आपल्याला पाठिंबा देत आली आहे. आपण खात्री केली आहे की हा आपला किल्ला आहे आणि आपण त्याचे रक्षण करतो. घरच्या मैदानावर खेळल्याने ते वेगळे होते. प्रेक्षकांचा पाठिंबा आहे आणि तुम्हाला परिस्थितीची जाणीव आहे. बुमराह आणि रोहित शर्मा परतला आहे. आमच्या अनुभवी खेळाडूंची मोट पुन्हा बांधली आहे. ज्यामुळे आम्हाला अतिरिक्त इंधन मिळते.’

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदार म्हणाली की, ‘ही मुंबईची सामान्य खेळपट्टी आहे, फलंदाजीसाठी चांगली असेल. चांगले क्रिकेट खेळणे महत्त्वाचे आहे. गोलंदाजी युनिट, येथे गोलंदाजी करणे कठीण आहे पण मला खूप आत्मविश्वास आहे. आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहोत, प्रत्येक ठिकाणी आम्हाला काय करायचे आहे हे स्पष्ट आहे. आम्ही त्याच संघासोबत खेळत आहोत.’

दोन्ही संघाचे खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर: रसिक दार सलाम, सुयश शर्मा, स्वस्तिक चिकारा, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर

मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेयर्स: रोहित शर्मा, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिंझ, अश्वनी कुमार, राज बावा
संघ: