
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध तोडफोड बॅटिंग केली आहे. आरसीबीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत 220 पार मजल मारली आहे. आरसीबीने मुंबईसमोर 222 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 221 धावा केल्या. आरसीबीसाठी विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार या दोघांनी सर्वाधिक धावांची खेळी केली. तसेच देवदत्त पडीक्कल याने चांगली साथ दिली. तर अखेरच्या क्षणी जितेश शर्मा याने नाबाद 40 धावांची खेळी केली. त्यामुळे आरसीबीला सहज 200 पार पोहचता आलं. तर मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पंड्या आणि ट्रेन्ट बोल्ट या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर विघ्नेश पुथुर याने 1 विकेट मिळवली.
विराट कोहलीने 42 चेंडूत 2 सिक्स आणि 8 फोरसह 67 रन्स केल्या. विराटने या खेळीदरम्यान टी 20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पार केला. कर्णधार रजत पाटीदार याने 200 च्या स्ट्राईक रेटने 32 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 64 रन्स केल्या. देवदत्त पडीक्कल याने 22 बॉलमध्ये 37 रन्स केल्या. तर जितेश शर्मा याने शेवटच्या काही षटकांमध्ये धमाका केला. जितेशने 19 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या. टीम डेव्हिड 1 धाव करुन नाबाद परतला. फिल सॉल्टने 4 धावांचं योगदान दिलं. तर लियाम लिविंगस्टोन याला भोपळाही फोडता आला नाही.
मुंबईला 2 पॉइंट्ससाठी 222 धावांची गरज
Innings Break!
Power-packed batting display from #RCB 💥
They post a solid target of 2️⃣2️⃣2️⃣ for the home side 🎯#MI‘s exciting chase on the other side ⌛️
Scorecard ▶ https://t.co/Arsodkwgqg#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/pyHCGnvO8X
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विघ्नेश पुथूर.