AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : किंग कोहलीचा वानखेडेत ‘विराट’ कारनामा, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Virat Kohli vs Mumbai Indians : विराट कोहली याने पुन्हा एकदा त्याला रनमशीन का म्हणतात हे दाखवून दिलं आहे. विराटने वानखेडे स्टेडियममध्ये चाबूक खेळी करत महारेकॉर्ड केला आहे. विराट अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

Virat Kohli : किंग कोहलीचा वानखेडेत 'विराट' कारनामा, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
Virat Kohli Rcb Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 07, 2025 | 8:56 PM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात (Ipl 2025) इतिहास घडवला आहे. विराटने या हंगामातील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) वानखेडे स्टेडियममध्ये महारेकॉर्ड केला आहे. विराटने टी 20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहली अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय तर एकूण पाचवा फलंदाज ठरला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे.

17 धावा आणि महारेकॉर्ड

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीकडून फिल सॉल्ट याच्या सोबत विराट सलामीला आला. विराटच्या नावावर या सामन्याआधी टी 20 क्रिकेटमध्ये 12 हजार 983 धावा होत्या. त्यामुळे विराटला 13 हजारांसाठी 17 धावांची गरज होती. विराटने 17 धावा पूर्ण करताच मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं. विराटआधी ख्रिस गेल. एलेक्स हेल्स, शोएब मलिक आणि किरोन पोलार्ड या फलंदाजांनी ही कामगिरी करुन दाखवली आहे.

विराटने यासह आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली. विराट वेगवान 13 हजार धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला. विराटने 386 टी 20 डावांमध्ये ही कामगिरी केली. तसेच वेगवान 13 हजार धावांचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने विराटच्या तुलनेत 5 डावांआधी 13 हजार धावा केल्या आहेत. गेलने 381 डावांमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.

13 हजारी विराट कोहली

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विघ्नेश पुथूर.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.