IPL 2025 PBKS vs MI Live Streaming : एका जागेसाठी दोघांमध्ये चुरस, पंजाब-मुंबईत कडवी झुंज
Punjab Kings vs Mumbai Indians Qualifier 2 Live Streaming : पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहचण्यासाठी सज्ज आहे. मात्र कोणत्या तरी एका संघाचं हे स्वप्न भंग होणार आहे. अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोण? हे पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

आयपीएलचा 18 वा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. अवघ्या 2 सामन्यानंतर विजेता निश्चित होईल आणि 18 व्या हंगामाचा शेवट होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2016 नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने क्वालिफायर 1 मध्ये पंजाबचा धुव्वा उडवत फायनलचं तिकीट मिळवलं. तर साखळी फेरीनंतर टॉप 2 मध्ये असल्याने पंजाब किंग्सला अंतिम फेरीत पोहचण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. पंजाबला फायनलमध्ये पोहचण्यासाठी मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 सामना केव्हा?
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 सामना रविवारी 1 जून रोजी होणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 सामना कुठे?
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
मुंबईने आपल्या मोहिमेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना गमावला. पंजाबने मुंबईवर मात केली आणि नववा विजय मिळवला. पंजाबने यासह पहिल्या स्थानी झेप घेतली. यासह पंजाबला अंतिम फेरीत पोहचण्याची अतिरिक्त संधी मिळेल, हे निश्चित झालं. पंजाबला आरसीबी विरुद्ध जिंकून पहिल्याच झटक्यात फायनलमध्ये पोहचता आलं नाही. मात्र आता पंजाबकडे आणखी एक संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईने एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवत क्वालिफायर 2 चं तिकीट मिळवलंय. त्यामुळे मुंबई फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे पंजाब दुसऱ्या संधीचं सोनं करत आयपीएल ट्रॉफीच्या आणखी जवळ पोहचणार की पलटण बाजी मारणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
