AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs DC : रजत पाटीदारची दिल्ली कॅपिट्ल्सला जिंकवण्यात ऑन कॅमेरा मदत! व्हीडिओ व्हायरल

Rajat Patidar RCB vs DC : रजत पाटीदार याने दिल्ली कॅपिट्ल्सविरुद्ध केलेली एक चूक आरसीबीच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली आहे. जाणून घ्या नक्की काय झालं?

RCB vs DC : रजत पाटीदारची दिल्ली कॅपिट्ल्सला जिंकवण्यात ऑन कॅमेरा मदत! व्हीडिओ व्हायरल
Rajat Patidar Rcb Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 11, 2025 | 4:29 PM
Share

दिल्ली कॅपिटल्सने गुरुवार 10 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 6 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी मिळालेलं 164 धावांचं आव्हान हे अवघ्या 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दिल्लीने आरसीबीला पराभूत करत आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात सलग आणि एकूण चौथा विजय साकारला. एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात ‘लोकल बॉय’ केएल राहुल हा आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

केएलने दिल्लीसाठी नाबाद 93 धावांची खेळी केली आणि सहज विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीचा हा एकूण आणि घरच्या मैदानातील दुसरा पराभव ठरला. रजत पाटीदार याची एक चूक ही आरसीबीच्या पराभवाला कारणीभूत ठरली. रजतने ऑन कॅमेरा ही चूक करत एकाप्रकारे आरसीबीला जिंकवण्यात मदत केली, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

नक्की काय झालं?

आरसीबीने दिल्ली कॅपिट्ल्सला 164 धावांचा पाठलाग करताना तिसर्‍या ओव्हरपर्यंत 2 झटके देत अप्रतिम सुरुवात केली होती. फाफ डु प्लेसीस आणि जेक फ्रेझर मॅकग्रूक ही सलामी जोडी आऊट झाल्याने दिल्ली बॅकफुटवर आली होती. त्यानंतर आरसीबीला आणखी एक विकेट घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवण्याची संधी होती. मात्र कर्णधार रजत पाटीदार याने या संधची माती केली.

रजतने मॅचविनर ठरलेल्या केएल राहुल याचा कॅट सोडला. दिल्लीच्या डावातील चौथी ओव्हर यश दयाल टाकत होता. या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर केएलने मोठा फटका मारला. रजतने हवेतील बॉलचा अचूक अंदाज घेत त्या वेगात धावला आणि कॅच घेण्यासाठी झेप घेतली. रजतला पहिल्या प्रयत्नात कॅच घेता आला नाही. रजतच्या हातून बॉल सटकला. रजतने दुसऱ्या प्रयत्नात कॅच घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रजत इथेही अपयशी ठरला आणि अशापक्रारे केएलला कर्णधार रजत पाटीदार कडून जीवनदान मिळालं. रजतने कॅच सोडली तेव्हा केएल 5 धावांवर होता. तर केएलने नाबाद 92 धावांची खेळी करत दिल्ली विजय मिळवून दिला. रजतची ही एक चूक आरसीबीला अशाप्रकारे पराभूत करण्यात निर्णायक ठरली.

कॅच नाही, मॅच सोडली

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन: फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल