IPL 2025 : विराट कोहलीचं केएल राहुलला कांतारा स्टाईल प्रत्युत्तर, तसं केलं आणि मग…. Watch Video

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ रजत पाटिदारच्या नेतृत्वात यंदा चमकदार कामगिरी करत आहे. प्लेऑफमधील स्थान पक्कं करण्यासाठी आता फक्त एक विजय हवा आहे. 3 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवताच प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरेल. असं असताना दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यातील एक वेगळंच द्वंद्व पाहायला मिळालं.

IPL 2025 : विराट कोहलीचं केएल राहुलला कांतारा स्टाईल प्रत्युत्तर, तसं केलं आणि मग.... Watch Video
विराट कोहली कांतारा स्टाईल
Image Credit source: video grab
| Updated on: Apr 28, 2025 | 3:44 PM

विराट कोहली सलग 18 वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खेळत आहे. तर केएल राहुल बरेच संघ फिरून झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघात आला आहे. तसं पाहिलं तर विराट कोहली दिल्लीचा, तर केएल राहुल बंगळुरुचा आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंमध्ये एक वेगळंच द्वंद्व पाहायला मिळालं. दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धुव्वा उडवला होता. आयपीएल स्पर्धेच्या 24व्या सामन्यात हे दोन संघ आमनेसामने आले होते. एम चिन्नास्वामी मैदानात रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 6 विकेट आणि 13 चेंडू राखून पराभव केला होता. यावेळी केएल राहुलने 53 चेंडूनत नाबाद 93 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. तसेच कांतारा स्टाईल सेलीब्रेशन करून विजय साजरा केला होता. हे मैदान माझं आहे असं त्याने या सेलिब्रेशनमधून दाखवून दिलं होतं. मग काय त्या सेलिब्रेशनचं कुठे ना कुठे प्रत्युत्तर मिळणार होतंच ना.. त्यात विराट कोहली कोहली बंगळुरु संघात असेल तर ते होणार हे नक्कीच होतं.

आयपीएलमध्ये रंगलेल्या 46व्या सामन्यात मात्र आरसीबीने त्या पराभवाची परतफेड केली. आरसीबीने हा सामना 6 विकेट आणि 9 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात विराट कोहलीने 47 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर कृणाल पांड्याने 47 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली केएल राहुलच्या जवळ गेला. तसेच त्याला डिवचत कांतारा स्टाईल रिंगण केलं. पण पुढे जाऊन केएल राहुलला लगेच मिठी मारली. यावेळी केएल राहुलने त्याचं तसंच स्वागत केलं.

विराट कोहली जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे. त्याने पुन्हा एकदा आपल्या बॅटने हे सिद्ध करून दाखवलं आहे. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात 443 धावा केल्या आहेत. तसेच ऑरेंज कॅप मिळवली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 6 सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली आहे. यात त्याचा नाबाद 73 ही सर्वोत्तम खेळी आहे. त्याने 39 चौकार आणि 13 षटकार मारले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 138.87 चा आहे. सध्या आरसीबीची विजयी घोडदौड पाहता मागच्या काही वर्षांपासून अधुरं असलेलं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.