AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs PBKS : आयपीएल प्लेऑफमध्ये पंजाब किंग्सच्या नावावर नकोसा विक्रम, 2008 नंतर पहिल्यांदा असं घडलं

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना फक्त 101 धावा केल्या आहेत. त्यामुळे आरसीबीचा विजय पक्का मानला जात आहे. 2008 नंतर पंजाब किंग्सच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

RCB vs PBKS : आयपीएल प्लेऑफमध्ये पंजाब किंग्सच्या नावावर नकोसा विक्रम, 2008 नंतर पहिल्यांदा असं घडलं
पंजाब किंग्सImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 29, 2025 | 9:36 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा आरसीबीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यच होता असंच म्हणावं लागेल. कारण पंजाब किंग्सने आरसीबीच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. मार्कस स्टोयनिसने सर्वाधिक 26 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही. प्रभसिमनर सिंह आणि शेपटच्या अझमतुल्लाहने प्रत्येकी 18 धावा केल्या. इतर सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. मुशीर खानला डेब्यू सामन्यात खातंही खोलता आलं नाही. तीन चेंडूंचा सामना केला आणि सुयश शर्माच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. प्लेऑफच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला आहे. आयपीएल इतिहासात प्लेऑफमध्ये इतकी कमी षटकं खेळून सर्वबाद होणारा संघ ठरला आहे. पंजाब किंग्सने हा सामना गमावला तर क्वॉलिफायर दोन फेरीत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यापैकी विजयी संघाशी लढावं लागेल.  आरसीबीने हा सामना जिंकला तर चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणार आहे.

आयपीएल प्लेऑफमध्ये कोणत्याही संघाने खेळलेली सर्वात कमी षटके आहेत. पंजाब किंग्स संघ 14.1 षटकं खेळू शकला. याआधी 2008 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 16.1 षटके खेळली होती. तसेच प्लेऑफमध्ये सर्वात कमी धावा करणारा चौथा संघ ठरला आहे. डेक्कन चार्जर्सने 2010 मध्ये आरसीबीविरुद्ध 82 धावा, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स 2008 मध्ये 87 धावा, लखनौ सुपर जायंट्सने 2023 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध एलिमिनेटर फेरीत 101 धावा केल्या होत्या. आता पंजाब किंग्सने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 101 धावा केल्या आहेत.

आयपीएल प्लेऑफमध्ये फक्त एकदाच 140 पेक्षा कमी धावसंख्या बचावली गेली आहे. आयपीएल 2017 च्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्स अंतिम सामन्यात असं झालं होतं. मुंबई इंडियन्सने विजयासाठी 20 षटकात 129 धावांचं आव्हान दिलं होतं. रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ 128 धावा करू शकला आणि मुंबई इंडियन्सने हा सामना एका धावेने जिंकला होता. कृणाल पांड्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.