
आयपीएल 2025 स्पर्धेतील 42 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. संजू सॅमसन याच्या गैरहजेरीत रियान पराग याच्याकडे राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा आहे. तर रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करत आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार रियानने फिल्डिंगचा निर्णय घेत होम टीम आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यामुळे आरसीबी या संधीचा फायदा घेण्यात किती यशस्वी ठरणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
आरसीबी आणि राजस्थान या दोन्ही संघांचा हा या मोसमातील प्रत्येकी नववा सामना आहे. तसेच दोन्ही संघांची ही या मोसमात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. आरसीबीने राजस्थानला गेल्या सामन्यात पराभूत केलं होतं. तसेच राजस्थानला या मोसमात आपलं आव्हान कायम राखायचं असेल तर हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आरसीबीसाठी हा सामना फार अटीतटीचा आणि प्रतिष्ठेचा आहे.
आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबी 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे.आरसीबीने हे पाचही सामने घराबाहेर जिंकले आहेत. मात्र आरसीबी घरच्या मैदानात जिंकण्यात सलग 3 सामन्यांमध्ये अपयशी ठरली आहे. त्यामुळे आरसीबीचा हा सामना जिंकून घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडण्यासह प्लेऑफच्या आणखी जवळ पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.
राजस्थानने या मोसमात 8 पैकी एकूण 6 तर सलग 4 सामने गमावले आहेत. तसेच आरसीबीने 13 एप्रिलला राजस्थानवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे राजस्थानसमोर आरसीबीवीर मात करत पराभवाचा वचपा घेण्यासह विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये 4 गुणांसह आठव्या स्थानी आहे.
राजस्थानने टॉस जिंकला, मॅच जिंकणार का?
🚨 Toss 🚨@rajasthanroyals elected to field against @RCBTweets
Updates ▶️ https://t.co/mtgySHh88K #TATAIPL | #RCBvRR pic.twitter.com/8JwwIHyOmh
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, फजलहक फारुकी, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.