IPL 2025 RR vs RCB Live Streaming: राजस्थान विरुद्ध बंगळुरु पुन्हा आमनेसामने, विराटची टीम घरात खातं उघडणार?
Royal Challengers Bengaluru vs Rajasthan Royals Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला या आयपीएल 18 व्या मोसमात आतापर्यंत एकदाही घरच्या मैदानात विजयी होता आलेलं नाही. त्यामुळे राजस्थानविरुद्ध आरसीबी ही प्रतिक्षा संपवणार का?

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघ साखळी फेरीत 13 एप्रिलनंतर पुन्हा आमनेसामने असणार आहेत. आरसीबीने गेल्या सामन्यात राजस्थानवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आता राजस्थानसमोर 10 दिवसांनी आरसीबीविरुद्ध विजय मिळवून पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीसमोर पुन्हा एकदा घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
आरसीबी विरुद्ध राजस्थान सामना केव्हा?
आरसीबी विरुद्ध राजस्थान सामना गुरुवारी 24 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
आरसीबी विरुद्ध राजस्थान सामना कुठे?
आरसीबी विरुद्ध राजस्थान सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे होणार आहे.
आरसीबी विरुद्ध राजस्थान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
आरसीबी विरुद्ध राजस्थान सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
आरसीबी विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
आरसीबी विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
आरसीबी विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
आरसीबी विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दोन्ही संघाची पॉइंट्स टेबलमधील स्थिती
दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण आणि प्रत्येकी नववा सामना असणार आहे. आरसीबीने 8 पैकी पाचही सामने घराबाहेर जिंकले आहेत. तर आरसीबीने तिन्ही सामने हे घराबाहेर गमावले आहेत. त्यामुळे आरसीबीने घरच्या मैदानात जिंकावा आणि प्रतिक्षा संपवावी, अशी आशा चाहत्यांना असणार आहे. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये 10 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर राजस्थान रॉयल्सला या मोसमात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. राजस्थानला या मोसमात खेळलेल्या 8 पैकी फक्त 2 सामन्यातच जिंकता आलं आहे. राजस्थान 4 गुणांसह आठव्या स्थानी आहे.
रियान पराग याच्याकडे नेतृत्व
दरम्यान राजस्थान रॉयल्सचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याला आरसीबी विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागणार आहे. संजूला दुखापीतमुळे आरसीबी विरुद्ध खेळता येणार नाही. त्यामुळे रियान पराग आरसीबी विरुद्ध राजस्थानचं नेतृत्व करणार आहे.
