SRH vs DC : ट्रिस्टन स्टब्स-आशुतोष शर्माने लाज राखली, हैदराबादसमोर 134 रन्सचं टार्गेट, दिल्ली जिंकणार?
Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals 1st Innings Highlights : ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोश शर्मा या दोघांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या निर्णायक भागदीराच्या जोरावर दिल्लीने हैदराबादसमोर 134 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा या जोडीने सहाव्या विकेटसाठी केलेल्या निर्णायक अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने सनरायजर्स हैदराबादसमोर 134 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवलं आहे. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. दिल्लीच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यामुळे दिल्लीला 100 धावा करता येतील की नाही? अशी शंका उपस्थितीत करण्यात येत होती. मात्र ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे दिल्लीला 130 पार मजल मारता आली. त्यामुळे आता हैदराबादचा हे आव्हान झटपट पार करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हैदराबादला हा सामना जिंकण्यात यश येतं की दिल्ली धावांचा बचाव करते? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
दिल्लीची घसरगुंडी
सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कर्णधार पॅट कमिन्स याच्यासह हैदराबादच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना ढेर केलं. दिल्लीचे टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. करुण नायर डावातील पहिल्याच बॉलवर आऊट झाला. फाफ डु प्लेसीस 3 रन्स करुन आऊट झाला. अभिषेक पोरेल 8 रन करुन माघारी परतला. केएल राहुल यानेही निराशा केली. केएलने 10 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीची स्थिती 5 आऊट 29 अशी झाली.
त्यानतंर ट्रिस्टन स्टब्स आणि विपराज निगम या दोघांनी दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विपराज निगम 18 धावांवर रन आऊट झाला आणि ही सेट जोडी फुटली. त्यानंतर आशुतोष शर्मा मदैानात आला. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोश शर्मा या दोघांनी दिल्लीचा डाव सावरला. या जोडीने साव्या विकेटसाठी निर्णायक अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीला 130 पार मजल मारता आली.
हैदराबादसमोर 134 धावांचं आव्हान
Innings Break!
A dominant bowling effort from #SRH led by Pat Cummins restricts #DC to 1⃣3⃣3⃣
Updates ▶ https://t.co/1MkIwk4VNE#TATAIPL | #SRHvDC | @SunRisers pic.twitter.com/JFGWH7AhjD
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2025
स्टब्स आणि शर्मा या दोघांनी सातव्या विकेटसाठी 66 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर आशुतोश शर्मा आऊट झाला. आशुतोषने 24 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 41 रन्स केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स याने 36 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 41 धावांनी नाबाद खेळी केली. तर मिचेल स्टार्क 1 धाव करुन नाबाद परतला. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जयदेव उनाडकट, हर्षल पटेल आणि इशान मलिगां आ तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
