SRH vs DC सामना पावसामुळे रद्द, सनरायजर्स हैदराबाद IPL 2025 मधून ‘आऊट’
Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Rain Ipl 2025 : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल् यांच्यातील सामन्याचं आयोजन हे राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पहिल्या डावानंतर आलेल्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.

आयपीएल 2025 मधून मोठी बातमी समोर आली आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना हा पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे पहिल्या डावानंतर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. आयपीएलने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच यासह सनरायजर्स हैदराबादचंही या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं आहे. हैदराबाद राजस्थान आणि चेन्नईनंतर या स्पर्धेतून बाहेर पडणारी तिसरी टीम ठरली आहे. तसेच आयपीएलच्या 18 व्या मोसमात सामना पावसामुळे रद्द होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी 26 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
पावसामुळे सामना पाण्यात
हैदराबादने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं होतं. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांना दुसऱ्या डावातील खेळाची सुरुवात होण्याची प्रतिक्षा होती. मात्र सामन्यात अचानक पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे दुसऱ्या डावातील खेळाला सुरुवात होण्यास विलंब होणार हे स्पष्ट झालं. जोरदार पाऊस झाला. त्यानंतर मेघराजाने विश्रांती घेतली. मात्र आता ग्राउंड स्टाफसमोर खेळपट्टी झटपट कोरडी करण्यासह ती खेळण्यासाठी तयार करण्याचं आव्हान होतं. ग्राउंड स्टाफने त्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र अखेर सामना होऊ शकत नसल्याचं स्पष्ट झालं. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हस्तांदोलन केलं आणि सामना रद्द झाल्याचं स्पष्ट झालं.
दिल्लीची बॅटिंग
दिल्लीच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यामुळे दिल्लीची वाईट स्थिती झाली. करुण नायर 0, फाफ डु प्लेसीस 3, अभिषेक पोरेल 8, केएल राहुल 10 आणि कर्णधार अक्षर पटेल याने 6 धावा केल्या. मात्र त्यानंतर विपराज निगम, आशुतोष शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्स या त्रिकुटाने दिल्लीची लाज राखली आणि 130 पार पोहचवलं.
पावसामुळे IPL 2025 मधील दुसरा सामना रद्द
🚨 News 🚨
Match 55 between @SunRisers and @DelhiCapitals has been called off due to wet outfield.
Both teams share a point each.
Scorecard ▶ https://t.co/1MkIwk4VNE #TATAIPL | #SRHvDC pic.twitter.com/VnVZWjsjGJ
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2025
दिल्लीसाठी ट्रिस्टन स्टब्स याने सर्वाधिक धावा केल्या. स्टब्सने 36 बॉलमध्ये नॉट आऊट 41 रन्स केल्या. विपराज निगम याने 17 चेंडूत 18 धावा जोडल्या. तर आशुतोष शर्माने 26 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 फोरसह 41 रन्स केल्या. तर हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर हर्षल पटेल, इशान मलिंगा आणि जयदेव उनाडकट या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
