AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: प्रेक्षक नाहीत.. जाहिराती नाहीत.. टीआरपी रेटिंग तळाला.. क्रिकेटची क्रेझ कमी झाली का?

आयपीएल 2026 स्पर्धा आता मध्यात आली आहे. मात्र क्रीडाप्रेमींमध्ये यंदा स्पर्धेचा उत्साह कमी झाल्याचं जाणवत आहे. जाहिरात कंपन्यांनीही आयपीएलवरील खर्चात कपात केल्याचं बोललं जात आहे. कारण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा जाहिरातदाराची संख्या 31 टक्क्यांनी घटली आहे.

IPL 2026: प्रेक्षक नाहीत.. जाहिराती नाहीत.. टीआरपी रेटिंग तळाला.. क्रिकेटची क्रेझ कमी झाली का?
IPL 2026: प्रेक्षक नाहीत.. जाहिराती नाहीत.. टीआरपी रेटिंग तळाला.. क्रिकेटची क्रेझ कमी झाली आहे का?Image Credit source: X
| Updated on: May 04, 2026 | 5:13 PM
Share

आयपीएल स्पर्धा ही जगातील श्रीमंत क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत कोट्यवधी रूपयांची उधळण होत असते. त्यामुळे खेळाडूही या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. पण आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व अर्थात 2026 स्पर्धेला प्रेक्षकांची हवी तशी साथ मिळताना दिसत नाही. यंदा स्पर्धेचा निम्मा टप्पा पार झाला आहे. पण ही स्पर्धा टीआरपी रेटिंगमध्ये खूपच मागे पडल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रेक्षसंख्येत घट झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे क्रिकेट जाणकारानीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रेक्षकच नाही तर जाहिरातदारही हळूहळू या स्पर्धेतून काढता पाय घेत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि प्रसारकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

आयपीएल स्पर्धेची आकडेवारी काय सांगते?

बार्क इंडिया आणि टॅम स्पोर्ट्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आयपीएल 2026 च्या टीआरपी रेटिंगमध्ये 18.8 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.  टीआरपी 4.57 वरून 3.71 पर्यंत खाली आला आहे.तर सरासरी प्रेक्षकसंख्येत 26 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी 12.40 कोटी लोकांपर्यंत पोहोचलेली ही स्पर्धा यंदा केवळ 11.36 कोटी लोकांपर्यंत मर्यादित राहिली आहे. हा आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूला एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

आयपीएल स्पर्धेकडे पाठ फिरवण्याची कारण काय?

आयपीएल स्पर्धा यंदा कंटाळवाणी असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यासाठी विविध कारणं सांगितली जात आहे. त्यापैकी काही कारण अधोरेखित केली आहे.

  • स्पर्धा आणि सामन्यांचं दीर्घ स्वरूप: आयपीएल 2026 स्पर्धा ही दीर्घकाळ चालत असल्याने सुरूवातीच्या सामन्यात तसा काही रस नसतो. दररोज होणारे सामने कंटाळवाणे होत असल्याची चर्चा आहे. मध्यात प्लेऑफची रंगत वाढली की सामन्यांना खऱ्या अर्थाने महत्त्व मिळतं. यातही काही सामने 4 तासांची मर्यादा ओलांडत आहेत. त्यामुळे इतक्या वेळ एकाच जागेवर खिळून राहणं कंटाळवाणं वाटतं.
  • सपाट खेळपट्ट्या आणि इम्पॅक्ट प्लेयर: सपाट खेळपट्ट्या आणि इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे गोलंदाजीची काही किंमतच उरली नाही. गोलंदाजांनी सामना काढला तरी इम्पॅक्ट प्लेयर येऊन सामना खेचून नेतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत हे नियम प्रेक्षकांना फार आवडले नसल्याचं दिसत आहे.
  • फँटसी एप्सवर बंदी: देशात फँटरी गेमिंग एप्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे एका मोठ्या वर्गाने या सामन्यांकडे पाठ फिरवली आहे. या एप्समुळे काही वर्ग पैशांची पैज लावण्यासाठी उत्साही असायचा. पण त्याला वेसण घातल्याने खासकरून तरूणांमध्ये स्पर्धेची आवड कमी झाली आहे. इतकंच काय तर चर्चाही होत नाही.
  • प्रेक्षकांच्या सवयी: आयपीएल स्पर्धेत दहा संघ खेळत आहेत. प्रत्येक फ्रेंचायझीचा एक प्रेक्षक वर्ग आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी या संघांचा मोठा चाहता वर्ग आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. पण त्यांची नाजूक असल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. इतकंच काय तर काही प्रेक्षक फक्त आपल्या आवडत्या संघाचे सामने पाहतात.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं