DC vs RR : रवींद्र जडेजाला निर्णायक सामन्यातून विश्रांती की पत्ता कट? जाणून घ्या
Delhi Capitals vs Rajasthan Royals Playing 11 : रवींद्र जडेजा बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देतो. तसेच जडेजा कडक फिल्डिंग करतो. जडेजा टीमसाठी तिहेरी भूमिका बजावतो. त्यामुळे जडेजा महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र जडेजा दिल्ली विरूद्धच्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनचा भाग नाही. जाणून घ्या कारण.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 61 व्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. आरसीबीने यासह प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर 17 मे रोजी डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन अक्षर पटेल याने टॉस जिंकून राजस्थान रॉयल्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दोन्ही संघांतील प्लेइंग ईलेव्हनबाबत जाणून घेऊयात.
दिल्ली कॅपिट्ल्सचा हा या मोसमातील 13 वा आणि राजस्थानचा 12 सामना आहे. दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. राजस्थानला या निर्णायक सामन्यात नाईलाजाने मोठा बदल करावा लागला आहे. अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनचा भाग नाही. जडेजा प्लेइंग ईलेव्हनमध्ये नसण्याचं कारण कॅप्टन रियान पराग याने टॉस दरम्यान सांगितलं.
रवींद्र जडेजा प्लेइंग ईलेव्हनमध्ये का नाही?
राजस्थानने दिल्ली विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केल्याची माहिती रियान पराग याने दिली आहे. “जड्डू भाईला (रवींद्र जडेजा) वर्कलोड मॅनेजमेंट आणि संबंधित इतर कारणांमुळे खेळता येणार नाहीय”, अशी माहिती रियान पराग याने दिली. तसेच रवींद्र जडेजा याच्या जागी रवी सिंग याला संधी देण्यात आली आहे. यासह रवीने राजस्थानकडून आयपीएल पदार्पण करणार आहे.
दिल्लीकडून किती बदल?
दिल्ली कॅपिट्ल्सनेही प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. आकीब नबीला वगळण्यात आलंय. तर विजय त्रिपुरणा याचं पदार्पण होणार आहे.
राजस्थान-दिल्ली कितव्या स्थानी?
दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, राजस्थान रॉयल्स पाचव्या आणि दिल्ली कॅपिटल्स आठव्या स्थानी आहे. राजस्थानने 11 पैकी 6 सामने जिंकलेत तर 5 सामने गमावले आहेत. तर दिल्लीने 12 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 7 सामन्यात दिल्लीला पराभूत व्हावं लागलं आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कॅप्टन), रवी सिंग, डोनोवन फरेरा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, ॲडम मिल्ने, ब्रिजेश शर्मा आणि यशराज पुंजा.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन: केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, साहिल पारख, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), माधव तिवारी, त्रिपुराना विजय, लुंगी एन्गिडी, मिचेल स्टार्क आणि मुकेश कुमार.