AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Final: एक इंचाचा गॅप आणि गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, आरसीबीला होणार असा फायदा

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. आता जेतेपदाला कोण गवसणी घालणार? याची उत्सुकता आहे. असं असताना शुबमन गिल आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. तर आरसीबीसाठी एक जमेची बाजू आहे.

IPL 2026 Final: एक इंचाचा गॅप आणि गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, आरसीबीला होणार असा फायदा
IPL 2026 Final: एक इंचाचा गॅप आणि गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, आरसीबीला होणार असा फायदाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 31, 2026 | 3:15 PM
Share

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 31 मे रोजी आयपीएल 2026 अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ भिडणार आहेत. या सामन्यात टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाज असलेल्या विराट कोहली आणि कर्णधार शुबमन गिलच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. या दोघांनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल स्पर्धेत दोघांचा सामना एकमेकांच्या संघांशी अनेकदा झाला आहे. त्यामुळे विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध आणि शुबमन गिलने आरसीबीविरुद्ध कशी कामगिरी केली आहे. आरसीबीने मागच्या वर्षी जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळे यंदाचा चॅम्पियनशिप राखण्याची संधी आहे. तसेच शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सला दुसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्याची संधी आहे. असं असताना गुजरात टायटन्सला गोत्यात आणण्याची एक संधी आरसीबीकडे आहे. एक इंचाचा गॅप शुबमन गिलच्या फलंदाजीत आहे. हा गॅप लक्ष्य केला तर आरसीबीच्या विजयाचा मार्ग सुकर होईल.

एक इंचाचा गॅप काय आहे?

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलच्या फलंदाजीत एक इंचाचा गॅप आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. चला तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात. शुबमन गिल फलंदाजी करताना चेंडूचा सामना करताना जेव्हा बॅट उचलतो तेव्हा बॅट खालून वर येताना त्याच्या बॅट आणि पॅडच्या मधे एक इंचाचा गॅप राहतो. आरसीबीच्या गोलंदाजांना हा गॅप लक्ष्य करायचा आहे. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या दोन गोलंदाजांकडे ही संधी आहे. या कारण या दोन्ही गोलंदाजांकडे इनस्विंग करण्याची ताकद आहे. भुवनेश्वर कुमारने शुबमन गिलला क्वॉलिफायर 1 मध्ये बाद केलं होतं. आता पुन्हा एकदा हा गॅप भेदल्यास आरसीबीचा विजय सोपा होईल.

अहमदाबादमध्ये गिलला बाद करणं कठीण!

क्वॉलिफायर 1 सामना धर्मशाळेत खेळला गेला होता. आता हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. गुजरात टायटन्सचं हे होमग्राउंड आहे. त्यामुळे या मैदानात शुबमन गिलचा गॅप भेदणं वाटतं तितकं सोपं नाही. या कारण या मैदानात शुबमन गिलचा रेकॉर्ड चांगला आहे. शुबमन गिलने टी20 क्रिकेटमध्ये 6134 धावा केल्या आहेत. त्यापैकी 1500 धावा या अहमदाबादमध्ये केल्या आहेत. या मैदानात त्याची फलंदाजी सरासरी 53.57ची आहे. तसेच टी20 करिअरबाबत बोलायचं तर 37.86 सरासरी आहे. यावरून या मैदानात शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपत असल्याचं दिसून येत आहे.

Follow Us
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं.
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून.
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमक
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमक.
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....